
india vs west indies odi series
वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वनडे सिरिजमध्ये वनडे मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी अत्यंत साधारण आणि निराशाजनक राहिल्याने, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या संघात पुनरागमनाची मागणी क्रिकेट वर्तुळातून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मात्र, या सर्व चर्चांवर भारताचा माजी फलंदाज आणि प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक दिनेश कार्तिक याने भारतीय क्रिकेट संघ आता मोहम्मद शमीच्या युगाच्या पुढे निघून गेला आहे, असे म्हटले आहे.
IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?
दिनेश कार्तिकने भारतीय गोलंदाजीच्या सध्याच्या स्थितीवर आणि शमीच्या भवितव्यावर भाष्य केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत आपल्या युवा वेगवान गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आली नाही हे अगदी खरे आहे. मात्र भारतीय संघ आता भविष्याचा विचार करत आहे. मोहम्मद शमी हा नक्कीच भारताचा एक चांगला आणि महान, यशस्वी गोलंदाज राहिला आहे. मात्र आता भारतीय क्रिकेट आता त्याच्या पुढे निघून गेले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या नवोदित आणि युवा वेगवान गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. पॉवरप्लेमध्ये विकेट्स न मिळणे आणि डेथ ओव्हर्समध्ये धावांवर नियंत्रण ठेवण्यास अपयश आल्याचे दिसून आले. मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि विशेषतः आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सातत्याने मॅच-विनिंग कामगिरी केली आहे. मात्र, त्याचे वाढते वय, तंदुरुस्तीची आव्हाने आणि भारतीय संघाचा बदलता दृष्टिकोन पाहता, निवड समिती नव्या चेहऱ्यांनया संधी देत असल्याचे पाहायला मिळत आहे.