
भारत-दक्षिण आफ्रिकेसाठी 'करो या मरो'ची लढत (Photo Credit - X)
कुठे होणार सामना?
विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम (Dr. YS Rajasekhara Reddy ACA-VDCA Cricket Stadium). हा सामना खेळवला जाणार आहे. सामन्याला दुपारी १:३० वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी १:०० वाजता होईल.
विराट आणि रोहितवर नजर
पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या निर्णायक सामन्यातही सर्वांच्या नजरा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर असतील. रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला होता. यात रोहित (५७ धावा) आणि विराट (१२० चेंडूंत १३५ धावा) यांनी दमदार खेळी केली होती. तर, रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४ विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या वनडेतही विराट कोहलीने १०२ धावांची शानदार खेळी केली होती. भारताने ३४८ धावांचे लक्ष्य देऊनही दक्षिण आफ्रिकेने ते सहज पार केले. शुभमन गिलच्या दुखापतीमुळे या मालिकेचे कर्णधारपद के. एल. राहुल सांभाळत आहेत.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शुक्र स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल, ज्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण सामना थेट पाहता येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना डीडी स्पोर्ट्सवर देखील थेट पाहता येईल.
सामना ऑनलाइन कुठे पाहायचा?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar अॅपवर ऑनलाइन देखील पाहता येईल, जिथे प्रेक्षक त्यांच्या मोबाईल फोनवर किंवा इतर उपकरणांवर सामना लाईव्ह पाहू शकतात.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेसाठी पूर्ण संघ
भारताचा पूर्ण संघ: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल (यष्टीरक्षक-कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव.
दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण संघ: एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, रुबिन हर्मन, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, रायन रिकेल्टन, ओटनील बार्टमन, टोनी डी झोर्झी, प्रिनेलन सुब्रायन.