
IND Vs NZ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले 199 रन्सचे टार्गेट भारताने सहज पूर्ण केले आहे. अभिषेक शर्मा आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्या स्फोटक जोडीने गोलंदाजांची दाणादाण उडवत भारताला शानदार विजय मिळवून दिला.
IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने भारताला 199 रन्सचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीने शानदार खेळीला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच या दोघांनी आक्रमक सुरुवात केली. पहिल्या 6 ओव्हर्समध्ये त्या दोघांनी 118 रन्स जोडल्या. त्यामुळे न्यूझीलंडच्या हातातून सामना निसटला.
वैभव आणि अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. केवळ 15 बॉलमध्ये अभिषेक शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर केवळ 35 बॉलमध्ये त्याने वेगवान शतक पूर्ण केले. तर वैभव सूर्यवंशीने 45 रन्सची खेळी केली. भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने टी-२० क्रिकेटमधला आपला फॉर्म कायम राखला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज खेळी करत त्याने आपल्या टी-२० करिअरमधील चौथे शतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने अफगाणिस्तान, इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध धमाकेदार शतके ठोकली आहेत. आजचे शतक त्याच्या करकीर्दीमधले दुसरे वेगवान शतक ठरले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध केवळ ३० बॉलमध्ये शतक केले होते.
ग्लेन मॅक्सवेल – 5 शतके
रोहित शर्मा – 5 शतके
फील सॉल्ट – 4 शतके
सूर्यकुमार यादव – 4 शतके
अभिषेक शर्मा – 4 शतके
IND Vs NZ: भुवीचा स्विंग फ्लॉप! Daryl Mitchell ने भारताला नुसता धुतला; विजयासाठी दिले बलाढ्य टार्गेट
अभिषेक शर्मा केवळ ग्लेन मॅक्सवेल आणि रोहित शर्मा यांच्या मागे आहे, ज्यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी ५-५ शतके पूर्ण केली आहेत. ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये अभिषेक शर्मा खेळत आहे, त्या फॉर्ममध्ये हा रेकॉर्ड मोडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Ans: तिसऱ्या टी 20 सामन्यात अभिषेक शर्माने 113 रन्सची शतकी खेळी केली.
Ans: अभिषेक शर्माने 35 बॉलमध्ये आपले दुसरे वेगवान शतक पूर्ण केले.