
Ind Vs NZ : अभिषेक आणि वैभवनं किवी गोलंदाजांना धु-धू धुतला, अन् पॉवरप्लेमध्ये विक्रम रचला
Ind Vs NZ : वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताच्या सलामीला आलेल्या धुरंधरांनी एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. सलामीला येण्याची संधी मिळालेला वैभव सूर्यवंशी (नाबाद 44) आणि अभिषेक शर्माने (नाबाद 67) न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सुरुवातीपासूनच पाणउतार करण्यास सुरुवात केली.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पॉवर प्लेमध्ये चक्क 118 धावा करण्याची किमया अभिषेक व वैभवच्या धुवांधार बॅटींगमुळे शक्य झाली. अशाप्रकारे भारताने हा नवा विक्रम आपल्या नावे रचला आहे.
भारताने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध पॉवर प्लेमध्ये एकही गडी न गमावता 118 धावा रचल्या व अनेक संघांचा विक्रम मागे सारला. भारताच्याआधी हा विक्रम रोमानिया संघाच्या नावे होता. त्यांनी 2021 मध्ये सर्बियाविरुद्ध 5.4 षटकात नाबाद 116 धावा केलेल्या. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडविरुद्ध एडनबर्गमध्ये 2024 साली स्कॉटलंडविरुद्ध एक बाद 113 धावांची किमया केली होती. तसेच भारताने या वर्षी दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 100 धावा करत पॉवर प्लेमधील नवा विक्रम रचला होता.
IND Vs NZ: भुवीचा स्विंग फ्लॉप! Daryl Mitchell ने भारताला नुसता धुतला; विजयासाठी दिले बलाढ्य टार्गेट
भारताने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 5 व्याच षटकात शंभर धावांचा पल्ला गाठत येथेही एक नवा विक्रम आपल्या नावे रचला होता. तर रोमानियाने सर्बियाविरुद्ध 5.2 षटकात शंभर धावांचा पल्ला गाठलेला. तर 2023 मध्ये साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध 5.3 षटकांत, ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडविरुद्ध 5.3 षटकांत, झिम्बॉब्वेने गांबियाविरुद्ध 5.5 आणि इंग्लंडने साउथ आफ्रिकाविरुद्ध 5.5 षटकात शंभर धावा करण्याचा विक्रम रचला होता.
आता जो कोणी संघ 4.5 षटकात शंभर धावा करण्याचा विक्रम रचेल, तेव्हाच भारताचा आजचा विक्रम मोडीत निघेल.
Ballon d’Or : किंग कोहलीने हॅरी केनला दिल्या शुभेच्छा, म्हणाला, तू या सन्मानाचे हक्कदार!
अभिषेकने न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 15 चेंडूंत अर्धशतक रचण्याचा नवा विक्रमही रचला आहे. दरम्यान, अभिषेकने याचवर्षी गुवाहाटीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 14 चेंडूंत अर्धशतक ठोकले होते. जलद अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तो आता तिसऱ्या स्थानी असून त्याच्या आधी अष्टपैलू युवराज सिंग (12 चेंडू) आणि कॉलिन मुन्रो (14 चेंडू) यांचा क्रमांक येतो.
Ans: भारताने पॉवर प्लेमध्ये एकही गडी न गमावता 118 धावा केल्या.
Ans: भारताने पॉवर प्लेमध्ये एकही गडी न गमावता 118 धावा करत यापूर्वीच्या 116 धावांच्या विक्रमाला मागे टाकले.
Ans: वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे भारताकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते.