डॅरिल मिचेलची शानदार खेळी (फोटो- सोशल मिडिया)
भारताने प्रथम घेतला गोलंदाजीचा निर्णय
दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा
न्यूझीलंडने भारताला दिले 199 रन्सचे टार्गेट
IND Vs NZ: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी 20 सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली. आज हा तिसरा टी 20 सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी करताना भारताला 199 रन्सचे टार्गेट दिले आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत ही सिरीज देखील जिंकणार आहे. मात्र या सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाल्यास पुढील दोन सामने चुरशीचे होणार आहेत.
भारताने टॉस जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार, फील एलन आणि टिम सायफर्टने न्यूझीलंडची सुरुवात केली. फील एलनने 40 तर टिम सायफर्टने 2 रन्सची खेळी केली. त्यानंतर डॅरिल मिचेलने शानदार अर्धशतकी खेळी केली. ग्लेन फिलिप्सने 17 रन्सची महत्वाची खेळी केली. डॅरिल मिचेलने 89 रन्सची महत्वाची खेळी केली. आजचा सामना न्यूझीलंडसाठी महत्वाचा असणार आहे.
IND vs NZ 3rd T20I Update: भारत-न्यूझीलंड तिसरा टी२० सामना आज, कसे असणार वातावरण आणि खेळपट्टी
भारताला न्यूझीलंडच्या केवळ 3 विकेट्स घेण्यात यश आले. भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हर्समध्ये तब्बल 40 रन्स देत एकही विकेट घेतली नाही. अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली. त्याने 33 रन्स दिल्या. अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डीने देखील प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताचे गोलंदाज थोडेसे अपयशी ठरल्याचे दिसून आले. भुवनेश्वर कुमारला तिसऱ्या सामन्यात देखील एकही विकेट मिळवणे शक्य झाले नाही. त्यामुळे पुढे त्याला संधी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, शिवम दुबे, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, कुमार कुशाग्र, मयंक यादव.
Vaibhav Sooryavanshi: ‘3 क्रमांकावर वैभवला पाठवून कामगिरी खराब…’, दिग्गजांनी उचलला वैभवसाठी आवाज
न्यूझीलंड संघ: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, जेकब डफी, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, ब्लेअर टिकनर, मॅथ्यू फिशर, डेव्हॉन कॉनवे.
Ans: न्यूझीलंडने भारताला 199 रन्सचे टार्गेट दिले आहे.
Ans: न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल 89 रन्सची महत्वाची खेळी केली.






