Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीत अभिषेक शर्माचा मोठा विक्रम; अवघ्या 96 चेंडूत शानदार 170 धावा

अभिषेक शर्माने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 96 चेंडूत 170 धावा केल्या. त्याने 22 चौकार आणि 8 षटकार मारून सौराष्ट्राविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली. या खेळीसह अभिषेक शर्माने वनडेत टीम इंडियासाठी जागा बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे

  • By युवराज भगत
Updated On: Dec 31, 2024 | 03:14 PM
Abhishek Sharma Hit 170 runs in 96 balls in Vijay Hazare Trophy

Abhishek Sharma Hit 170 runs in 96 balls in Vijay Hazare Trophy

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद : एकीकडे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात संघर्ष करीत आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांच्या बदलीच्या शोधात आहे, तर दुसरीकडे काही तरुणांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिषेक शर्मा. पंजाब आणि सौराष्ट्र यांच्यातील विजय हजारे करंडक फेरीच्या पाचव्या सामन्यात शुभमन गिलच्या जवळच्या मित्राने शानदार फलंदाजी केली आणि 96 चेंडूत 177 धावा केल्या. त्याच्या आणि प्रभसिमरन सिंगच्या दमदार शतकांच्या जोरावर पंजाबने 5 गड्यांच्या मोबदल्यात 424 धावा केल्या.

प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पंजाब संघाची धमाकेदार खेळी
अहमदाबादच्या गुजरात कॉलेज मैदानावर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पंजाब संघाने 31 षटकांत 298 धावा केल्या. त्यासाठी कर्णधार अभिषेक शर्माने विध्वंसक फलंदाजी केली आणि दुसऱ्या टोकाला प्रभसिमरन सिंगनेही चमत्कार घडवला. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 298 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिल्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. यादरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 96 चेंडूत 22 चौकार आणि 8 षटकार ठोकले.

प्रभसिमरन सिंगनेसुद्धा ठोकल्या धावा
दुसऱ्या टोकाला प्रभसिमरन सिंगने 95 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याने 125 धावा केल्या. यानंतर अखेरच्या सामन्यात अनमोल मल्होत्राने 45 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या तर सनवीर सिंगने 29 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे त्यावरून असे दिसते की तो लवकरच भारताकडून वनडे आणि कसोटी या दोन्ही सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.

१९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघात समावेश
19 वर्षाखालील विश्वचषक 2018 मध्ये अभिषेक शर्मा शुभमन गिल आणि पृथ्वी शॉसोबत खेळला. या हंगामात, राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, संघाने विश्वविजेते होण्याचा मान मिळवला होता, तर पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावर्षी आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर अभिषेकने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले.

हेही वाचा : ‘चक दे इंडिया’ गाणं वाजताच हॉस्पिटलमध्ये नाचू लागले विनोद कांबळी, व्हिडीओ व्हायरल

Web Title: Abhishek sharma hit 170 runs in 96 balls in vijay hazare trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • cricket
  • india
  • Rohit Sharma
  • Vijay Hazare Trophy

संबंधित बातम्या

आधी संरक्षण करार, आता सर्वोच्च सन्मान… पाकिस्तान आणि सौदीमध्ये नेमकं काय शिजतंय? पडद्यामागचा ‘खरा खेळ’ काय?
1

आधी संरक्षण करार, आता सर्वोच्च सन्मान… पाकिस्तान आणि सौदीमध्ये नेमकं काय शिजतंय? पडद्यामागचा ‘खरा खेळ’ काय?

पुन्हा ‘रो-को’चा जलवा! तब्बल इतक्या वर्षांनंतर Rohit-Virat घरगुती मैदान गाजवणार; नोट करुन घ्या तारीख
2

पुन्हा ‘रो-को’चा जलवा! तब्बल इतक्या वर्षांनंतर Rohit-Virat घरगुती मैदान गाजवणार; नोट करुन घ्या तारीख

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कशी असेल प्लेइंग इलेव्हन? रविचंद्रन अश्विनने सर्व खेळाडूंची केली नावे उघड
3

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कशी असेल प्लेइंग इलेव्हन? रविचंद्रन अश्विनने सर्व खेळाडूंची केली नावे उघड

T20 World Cup 2026 च्या आधी नेपाळ संघ कॅम्पसाठी तयार, 24 नावे जाहीर!  संघामध्ये आयपीएल क्रिकेटपटूचाही समावेश
4

T20 World Cup 2026 च्या आधी नेपाळ संघ कॅम्पसाठी तयार, 24 नावे जाहीर! संघामध्ये आयपीएल क्रिकेटपटूचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.