फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विनोद कांबळी यांची हेअल्थ अपडेट : भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची मागील बऱ्याच वर्षांपासून प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्याची हालत अत्यंत खराब आहे. विनोद कांबळी यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता यामध्ये त्यांची तब्येत खूपच खराब होती या व्हिडिओमध्ये त्यांना नीट बोलता आणि देखील येत नव्हते. आता भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या प्रकृतीचे अपडेट्स समोर आले आहेत. विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये नर्स स्टाफसोबत डान्स करताना दिसत आहे.
२१ डिसेंबर रोजी विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांबळी यांच्यावर आता रुग्णालयात मोफत उपचार सुरू आहेत. ५२ वर्षीय माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या वैद्यकीय चाचणीच्या अहवालानंतर आता विनोद कांबळी यांना ‘मेंदूतील गुठळ्या’चा त्रास असल्याचे समोर आले आहे. अनेक वैद्यकीय चाचण्यांनंतर डॉक्टरांनी ही माहिती दिली होती. कांबळीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ‘चक दे इंडिया’ गाण्यावर डान्स करत आहे. यादरम्यान त्याने क्रिकेटचा शॉटही मारला. त्याच्यासोबत एक महिलाही दिसली.
IND vs AUS : अशी असू शकते सिडनीमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, कोणत्या खेळाडूला वगळणार कॅप्टन?
यापूर्वी २४ डिसेंबर रोजी विनोद कांबळी यांनी हॉस्पिटलच्या बेडवर पडून गाणे गायले होते. यावेळी तो म्हणाला होता की मला आता बरे वाटत आहे. कांबळीने हॉस्पिटलच्या बेडवर ‘आम्ही चॅम्पियन आहोत…वुईल बॅक’ हे गाणे गायले. त्यांनी लोकांना दारू पिऊ नका असा सल्ला दिला. घरातील सदस्यांना ते आवडणार नाही म्हणून दारू पिऊ नये, असे ते म्हणाले होते.
हॉस्पिटल में ‘चक दे इंडिया’ गाने पर डांस करते दिखे विनोद कांबली, गाना गाते हुए शॉट भी लगाया। #VinodKambli pic.twitter.com/UnbuwO4Bb1
— Utkarsh Singh (@UtkarshSingh_) December 31, 2024
विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी १७ कसोटी सामने खेळताना १०८४ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या २२७ होती. या काळात त्याने ४ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली. तर विनोद कांबळीने १०४ एकदिवसीय सामने खेळताना २४७७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर २ शतके आणि १४ अर्धशतके आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांचे भेट झाली होती या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचबरोबर कपिल देव हे कांबळी यांची मदत करणार असे अनेक वृत्त समोर आली होती.