Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान

IND vs NZ 1st T20 Live First Innings Score: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज पहिला टी-२० सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला २२६ धावांचे आव्हान दिले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 22, 2026 | 03:03 PM
IND vs NZ 1st T20 Live First Innings

IND vs NZ 1st T20 Live First Innings

Follow Us
Follow Us:
  • फिलिप्सची बॅट तळपली भारतीय गोलंदाजांना धुतलं
  • किवींनी ठोकल्या २२५ धावा
  • भारताला विजयासाठी २२६ धावांचे लक्ष्य
IND vs NZ 1st T20 Live: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना आज खेळला जात आहे. हा सामना क्राइस्टचर्चमधील हॅगले ओव्हलवर सुरु आहे. या सामनन्यात, भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ विकेट्स गमावून २२५ धावा केल्या. किवींनी भारतासमोर विजयासाठी २२६ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्सने तुफानी फलंदाजी करत ४० चेंडूमध्ये ८२ धावा ठोकल्या. (Glenn Phillips Scored Unbeaten 82 of 40)

Cricket News: ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ स्टार गोलंदाजावर कारवाई; दोन सामन्यांची घातली बंदी

ग्लेन फिलिप्सच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड २०० पार

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत डावाची दमदार सुरुवात केली. टीम सायफर्ट आणि फिन ॲलन यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मयंक यादवने टीम सायफर्टला २४ धावांवर बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यानंतर, फिन ॲलनने ताबडतोब खेळी करत २४ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावांचे योगदान दिले. परंतु, फिरकीपटू अक्षर पटेलने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या डॅरिल मिचेलने १९ चेंडूमध्ये २८ धावा केल्या. मिचेल चांगल्या लयीत दिसत होता, परंतु अर्शदीप सिंगने त्याचा डाव संपवला.

संघाने तीन विकेट गमावल्यानंतर, ग्लेन फिलिप्स आणि बेवन जेकब्स यांनी ३२ चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. अर्शदीप सिंगने जेकब्सला रन आउट ही धोकादायक भागीदारी तोडली. जेकब्सने १६ चेंडूंमध्ये ३१ धावा करत तंबूत परतला. जेकब्स बाद झाल्यानंतर फिलिप्सने संपूर्ण जबाबदारी घेतली आणि न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. फिलिप्सने आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४० चेंडूंमध्ये नाबाद ८२ धावा ठोकल्या. न्यूझीलंडने ४ विकेट्स गमावून २२५ धावांचा टप्पा गाठला. आता भारताला विजयासाठी २२६ धावांची गरज आहे. भारताकडून अर्शदीप सिंग, मयंक यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

भारतीय संघात काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. भुवनेश्वर कुमारने तब्बल ४ वर्षानंतर भारतीय संघात दमदार पुनरागमन केले आहे. तर, वैभव सूर्यवंशीला अजूनही आपल्या संधीचा वाट पाहावी लागणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण ३१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. या ३१ सामन्यांपैकी भारताने १९, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. गेल्या सात वर्षांत न्यूझीलंडच्या भूमीवर भारताने एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना गमावलेला नाही.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मयंक यादव, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन.

‘मिया मॅजिक’ चा कॅप्टन्सी स्वॅग! Mohammed Siraj च्या नेतृत्वात हैदराबादचा कहर; सलग दुसरा दणदणीत विजय

Web Title: India vs new zealand 1st t20 match first innings live 225 score glenn phillips 80 runs pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Bhuvneshwar Kumar
  • Glenn Phillips
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

NZ vs IND 1st T20 Live: भारत-न्यूझीलंडचा पहिला T20 चा पहिला सामना, Playing XI, पिच रिपोर्ट आणि Weather Update
1

NZ vs IND 1st T20 Live: भारत-न्यूझीलंडचा पहिला T20 चा पहिला सामना, Playing XI, पिच रिपोर्ट आणि Weather Update

IND vs NZ: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? भुवनेश्वर कुमारच्या कमबॅकवरही सस्पेन्स; पहिल्या T20साठी कोणते ११ शिलेदार मैदानात उतरणार?
2

IND vs NZ: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? भुवनेश्वर कुमारच्या कमबॅकवरही सस्पेन्स; पहिल्या T20साठी कोणते ११ शिलेदार मैदानात उतरणार?

IND vs NZ: क्रिकेटचा फुल्ल ऑन थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार; पहिल्या T20 चे LIVE ॲक्शन कधी अन् कुठे पाहाल?
3

IND vs NZ: क्रिकेटचा फुल्ल ऑन थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार; पहिल्या T20 चे LIVE ॲक्शन कधी अन् कुठे पाहाल?

IND Vs NZ: भारताचा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडचे वाजवणार बारा? मिशेल सँटनर म्हणाला, ‘तो दोन्ही बाजूला…’
4

IND Vs NZ: भारताचा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडचे वाजवणार बारा? मिशेल सँटनर म्हणाला, ‘तो दोन्ही बाजूला…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.