
"There's something special about him..." According to Rohit Sharma, this player will be the one to win matches for the Indian team.
Statement on Rohit Sharma Tilak Verma : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज इंदूरमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ५ टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दरम्यानभारताचा स्टार अनुभवी खेळाडू रोहित शर्माने भारतीय क्रिकेटमधील पुढील सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू म्हणून तिलक वर्माला पसंती दिली आहे.
रोहित शर्माने तिलक वर्माबद्दल भाष्य केला आहे. रोहितने हे मान्य केले आहे की, तो भारताचा सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. रोहित शर्माकडून तिलक वर्माचे वर्णन एक खास आणि अपवादात्मक क्रिकेटपटू म्हणून करण्यात आले आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “मला वाटते की तिलकमध्ये काहीतरी वेगळे आहे; त्याचा दृष्टिकोन खूप चांगला असून विशेषतः त्याचा स्वभाव उत्कृष्ट आहे. आशिया कपच्या अंतिम सामन्यात तिलकने खेळलेली खेळी पहा, ती अविश्वसनीय अशीच होती. तिलकने त्या डावात एका सामना जिंकणाऱ्या खेळाडूची झलक दाखवून दिली होती. तो भारताचा सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे.”
हेही वाचा : बीसीसीआयचा एक निर्णय आयुष बदोनीसाठी ठरला वरदान! टीम इंडियासाठी उघडले दरवाजे
तिलक वर्मा हा एक सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वी, पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कपच्या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये भारताने अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या विकेट २० धावांच्या आत गमावल्या होत्या. भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा परिस्थितीत, तिलक वर्माने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावांची संस्मरणीय खेळी करून पाकिस्तानकडून अंतिम सामना हिसकावून घेतला होता. भारत आशिया कप विजेता ठरला आणि तिलक वर्माला सामनावीरांचा पुरस्कार देण्यात आला.\
टी२० विश्वचषक सुरू होण्याच्या एक महिना आधी टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. टी२० विश्वचषकासाठी मधल्या फळीतील टीम इंडियाचा सर्वात मजबूत दुवा असलेल्या तिलक वर्माच्या शस्त्रक्रियेने भारतीय क्रिकेट जगताला धक्का बसला होता. त्याला बरे होण्यासाठी तीन ते चार आठवडे लागण्याची शक्यता आहे. तो टी२० विश्वचषकातून बाहेर पडू शकतो का अशी अटकळ बांधली जात आहे.