Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटच्या मैदानावर अदानीचा पराभव! IPL मधील सर्वात मोठा करार या गुजराती मालकाच्या नावावर

अंबानी कुटुंबानंतर अदानी ग्रुपनेही आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण अदानीचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशाची ही स्वप्ने टोरेंट ग्रुपने धुळीस मिळवली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 13, 2025 | 12:02 PM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

गुजरात टायटन्स आयपीएल टीम : अंबानी कुटूंबाने मुंबई इंडियन्सला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ मागील बऱ्याच वर्षांपासून आयपीएलच्या मैदानावर कहर केला आहे. अंबानी कुटुंबानंतर अदानी ग्रुपनेही आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण अदानीचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशाची ही स्वप्ने टोरेंट ग्रुपने धुळीस मिळवली. टोरेंट ग्रुपने बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील मोठा हिस्सा ताब्यात घेण्याची घोषणा केली. या संपादनाची किंमत किती आहे याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

IND vs ENG 3rd ODI : गिल – जडेजा नाही तर हा खेळाडू ठरला ‘इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द सिरीज’, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये दाखवला जोर

तथापि, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा करार ५००० कोटी रुपयांना झाल्याचा दावा केला जात आहे. टोरेंट ग्रुपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (TIPL) या होल्डिंग कंपनीच्या माध्यमातून, CVC कॅपिटल पार्टनर्स (आयरेलिया स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) सोबत आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील ६७ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी करार करण्यात आला आहे.’ हा व्यवहार विविध मंजुरींच्या अधीन आहे (बीसीसीआयच्या मंजुरीसह). या कराराअंतर्गत, इरेलिया फ्रँचायझीमध्ये ३३ टक्के हिस्सा राखेल. या करारासह, टोरेंट ग्रुपने भारतातील वेगाने वाढणाऱ्या क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला आहे.

२०२१ मध्ये दोघांनीही ही संधी गमावली होती. या कराराबद्दल माहिती देताना, टोरेंट ग्रुपच्या संचालिका जिनल मेहता म्हणाल्या, ‘भारतात गेम्सना महत्त्व मिळत आहे, त्यामुळे टोरेंटला या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात क्षमता दिसते.’ २०२१ मध्ये अहमदाबादच्या आयपीएल टीम गुजरात टायटन्सला खरेदी करण्याची संधी अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपने हुकवली. यानंतर, दोघांकडून गुजरात टायटन्समध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अलिकडेच, ईटीने वृत्त दिले होते की सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपसोबत संघाचा कंट्रोलिंग स्टेक विकण्यासाठी चर्चा करत आहेत.

Women’s Primer League 2025 चा महासंग्राम सुरू होणार काही तासात! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming

बीसीसीआयने गुजरात टायटन्सला फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यांचा हिस्सा विकण्यास मनाई केल्यामुळे कराराला अंतिम स्वरूप देण्यात विलंब झाला . याच कारणामुळे कराराच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी कराराच्या अंतिम स्वरूपाची माहिती देण्यात आली. सीव्हीसी कॅपिटल देखील नफ्यात आपला हिस्सा विकण्याचा प्रयत्न करत होता. २०२१ मध्ये, बीसीसीआयने आयपीएलमध्ये दोन नवीन शहर-आधारित संघांचा समावेश करण्यासाठी बोली लावली होती. अहमदाबाद हे सर्वात जास्त चर्चेत असलेले शहर होते. त्यावेळी अदानी ग्रुपने ५१०० कोटी रुपये आणि टोरेंट ग्रुपने ४६५३ कोटी रुपये बोली लावली होती.

Web Title: Adanis defeat on the cricket field biggest contract in ipl to name of torrent group owner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : हर्षित राणाची कामगिरी संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी नाही! आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित
1

Asia Cup 2025 : हर्षित राणाची कामगिरी संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी नाही! आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित

सट्टा लावणाऱ्याचा होणार धंदा बंद…भारतात Dream11 बॅन होणार! ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 मंजूर झाल्यावर अ‍ॅपच्या अडचणी वाढणार
2

सट्टा लावणाऱ्याचा होणार धंदा बंद…भारतात Dream11 बॅन होणार! ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 मंजूर झाल्यावर अ‍ॅपच्या अडचणी वाढणार

अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती
3

अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे
4

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.