फोटो सौजन्य - Women's Premier League (WPL) सोशल मीडिया
महिला प्रिमियर लीग २०२५ : महिला प्रिमियर लीग २०२५ चा शुभारंभ काही तासांमध्ये सुरू होणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी वुमेन्स प्रीमियर लीग २०२५ चा पहिला सामना गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन वडोदरा येथे करण्यात आले आहे. तर या स्पर्धेमध्ये पाच संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटन्स आणि युपी वॉरियर्स हे संघ आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद स्मृती मंधनाकडे असणार आहे तर मुंबई इंडियन्सची कमान हरमनप्रीत कौर कडे असणार आहे. दीप्ती शर्मा युपी वॉरियर्सचे कॅप्टन पद सांभाळणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग असणार तर गुजरात जायंट्सचे ऑस्ट्रेलियाची ऍशलेह गार्डनरकडे कर्णधारपद असणार आहे. आता वूमेन्स प्रीमियर लीग २०२५ सुरू होण्याआधी या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
वुमेन्स प्रीमियर लीगचा पहिला सामना १४ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये रंगणार आहे. तुम्ही भारतात JioCinema अॅप आणि वेबसाइटवर WPL 2025 सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. याशिवाय, तुम्हाला नवराष्ट्र डिजिटलवर सर्व सामन्यांचे लाईव्ह अपडेट्स आणि लीगशी संबंधित बातम्या देखील वाचायला मिळतील.. तर टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक स्टार स्पोर्ट्सवर हा सामना पाहू शकतात. त्याचबरोबर भारतात स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर महिला प्रीमियर लीग २०२५ सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
वूमेन्स प्रीमियर लीग २०२५ चा उद्घाटन सोहळा काही तासांमध्ये सुरु होणार आहे. पहिल्या सामन्याआधी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराणा उद्घाटन सोहळ्याला परफॉर्मन्स देणार आहे आणि क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.
When cricket meets music 😇
Get ready to mesmerize your soul with the one and only 𝗔𝘆𝘂𝘀𝗵𝗺𝗮𝗻𝗻 𝗞𝗵𝘂𝗿𝗿𝗮𝗻𝗮 at the #TATAWPL mid-innings show on 14th Feb 🥳 🎶#GGvRCB | @ayushmannk pic.twitter.com/xzSjCKUHOi
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2025
१४ फेब्रुवारीपासून वूमेन्स प्रीमियर लीग सुरु होणार आहे तर १९ फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीचा हा महिना क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. भारताचा संघ आज मुंबईला गुजरातवरून आले आहेत. टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफीसाठी लवकरच युएईला रवाना होणार आहे.