Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर इब्राहिम जादरान आणि सेदिकुल्ला अटल यांनी डाव सावरला आणि आयरिश गोलंदाजांवर दबाव आणला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २२० चेंडूंमध्ये २३१ धावांची विक्रमी भागीदारी केली. ही अफगाणिस्तानची दुसऱ्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. तसेच, एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील ही दुसऱ्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.
इब्राहिम जादरानने उत्कृष्ट फलंदाजी करत ११ चौकार आणि एका षटकारासह त्याने ११८ चेंडूंमध्ये १०७ धावा केल्या. सेदिकुल्ला अटलने त्याहूनही अधिक आक्रमक फलंदाजी करत १२० चेंडूंमध्ये १४३ धावा केल्या. त्याच्या या तुफानी खेळीत १७ चौकार आणि चार षटकाराचा समावेश होता. अटल आणि जादरान यांच्यातील ही भागीदारी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये कोणत्याही विकेटसाठी अफगाणिस्तानची तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. इतकेच नव्हे तर, अफगाणिस्तानच्या एकदिवसीय इतिहासात एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी शतके झळकावण्याची ही केवळ चौथी वेळ आहे.
अटल आणि जादरान बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या डावाची गती थोडी मंदावली. दरविश रसूलीने १४ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या, तर अझमतुल्ला उमरझाई १२ चेंडूंमध्ये १५ धावा करून बाद झाला. कर्णधार रहमत शाह केवळ २ धावाच करू शकला. रशीद खानने १० चेंडूंमध्ये ११ धावा केल्या, तर हशमतुल्ला शाहिदी ७ धावा करून नाबाद राहिला. गझनफरला खाते उघडता आले नाही. अफगाणिस्तानने शेवटच्या दोन षटकांमध्ये तीन विकेट गमावले, ज्यामुळे संघाला ३५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. आयर्लंडकडून बायरन मॅकडोनो याने तीन विकेट घेतले, तर मार्क रिचर्ड अडायर आणि गॅविन होई यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले.
बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, आयर्लंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीने शतकी खेळी केली. त्याने ११९ चेंडूमध्ये १०९ धावा ठोकल्या. कर्णधार पॉल स्टर्लिंगने २७ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्टिस कॅम्फरचे शतक हुकले. त्याने ४६ चेंडूंमध्ये ८४ धावांची वादळी खेळी केली. मात्र, तो बाद होताच संपूर्ण संघ ढासळला. अफगाणिस्तानकडून यामिन अहमदझाईने ४ विकेट्स घेतले तर, राशीद खानने ३ विकेट्स घेतले. अझमतुल्ला ओमरझाईने २ विकेट्स घेतले. यासह अफगाणिस्तानने आयर्लंडवर दणदणीत विजय मिळवला.
मालिकेतील सर्व सामने बेलफास्टमध्ये खेळले जाणार आहेत. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडला अडचणीत आणले. त्यांनी दुसरा सामना ९८ धावांनी आणि तिसरा सामना तीन विकेट्सने जिंकला. आता, चौथा सामना जिंकून त्यांनी मालिका खिशात घातली. आता, १५ ऑगस्ट रोजी आयर्लंडला आपली प्रतिष्ठा वाचवण्याची शेवटची संधी मिळेल.
IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया हरली तरी Gautam Gambhir यांची खुर्ची कायम? BCCI चा मोठा निर्णय





