फोटो सौजन्य - ICC
भारताचा T-२० विश्वचषक २०२४ मध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला. या सामन्यांमध्ये टीम इंडियाने हा सामना ७ धावांनी जिंकला आणि भारत विश्वविजेता झाला. भारताच्या संघाने या विश्वचषकामध्ये अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. एवढेच नव्हे तर भारताने या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून विश्वविजेता झाला आहे. त्याचबरोबर T-२० विश्वचषक २०२४ च्या या महामुकाबल्यात असे दोन दिग्गज संघ उभे होते की त्यांनी या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ मागील काही वर्षांमध्ये वेगळ्या अंदाजात दिसला. शेवटच्या चेंडूवर भारताने विजय मिळवल्यावर सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू आले आणि कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा विश्वचषक भारताच्या संघातील अनेक दिग्गज खेळाडूंसाठी महत्वाचा आणि स्पेशल होता.
या विश्वचषकानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हे टीम इंडियासाठी प्रशिक्षक म्हणून निवृत्त होणार आहेत. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्माने हा त्याचा खेळ होता अशी निवृत्तीची घोषणा देखील केली आहे. त्याचबरोबर भारताचा रन मशीन विराट कोहलीने देखील सामना संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट साठी ही खूप मोठी दुःखद बातमी आहे की, भारताचे दोन दिग्गज खेळाडू क्रिकेटला अलविदा करत आहेत. या बातम्या ऐकून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. त्याचबरोबर भारताचा हिटमॅन (Indian Captain Rohit Sharma) आणि किंग कोहलीच्या (Virat Kohli) डोळ्यात देखील अश्रू पाहायला मिळाले.
भारताच्या संघाने १३ वर्षानंतर विश्वचषक २०२४ जिंकून क्रिकेट चाहत्यांचा दुष्काळ संपवला. त्याचबरोबर रोहितने आणि विराट कोहलीने त्याच्या निवृत्तीची घोषणा देखील केली. यावेळी विराट आणि रोहितचे अश्रू अनावर झाले आणि त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारून त्याच्या भावना व्यक्त केल्या. भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा शेवटचा सामना होता त्यामुळे रोहित शर्माने आणि पूर्ण संघाने त्यांना विश्वचषक विजेता म्हणून भेट दिली आहे.