India vs South Africa Toss Update : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन्ही संघाचा विश्वचषकाचा तिसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. टीम इंडियाने पहिल्या दोन सामन्यामध्ये विजय मिळवून आता विजयाच्या हॅट्रीकवर भारतीय महिला संघाची नजर असणार आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना पावसामुळे उशीरा सुरु झाला, विशाखापट्टणममध्ये पाऊस कोसळत होता त्यामुळे सामन्यावर त्याचा परिणाम होणार आहे. पहिल्या दोन सामन्यामध्ये भारताची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिने फार काही चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे आजच्या खेळीवर विशेष चाहत्यांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर भारताची कर्णधार हरमनप्रीतच्या बॅटने देखील मोठी खेळी आलेली नाही.
World Cup 2025. South Africa won the toss and elected to Bowl. https://t.co/G5LkyPuC6v #INDvSA #CWC25 #TeamIndia — BCCI Women (@BCCIWomen) October 9, 2025
श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करणारी अमनजोत कौर हिच्यावर भारतीय संघाची नजर असणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात खराब तब्येत असल्यामुळे सामना खेळला नव्हता त्यामुळे तिच्या जागेवर रेणुका ठाकुर हिला स्थान मिळाले आहे. क्रांती गौड हिने दोन्ही सामन्यामध्ये कमालीचा खेळ आणि गोलंदाजी दाखवली आहे तिच्याकडून या सामन्यामध्ये चांगली कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताच्या संघाला पहिले फलंदाजी करायची आहे त्यामुळे भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हीच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दिप्ती शर्मा मागील दोन्ही सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारतीय सलामीवीर फलंदाजावर आज विशेष लक्ष असणार आहे.
प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, अमनजोत कौर
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, सुने लुस, मारिजन कॅप, अनेके बॉश, सिनालो जाफ्ता, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, तुमी सेखखुने, नॉनकुलुलेको म्लाबा,