आशिया कप (Asia Cup) सुरु होण्यासाठी आता अवघे २ दिवस शिल्लक असून आशिया कप २०२२ करीता पात्रता फेरी पूर्ण करण्यात आली आहे. २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये मुख्य फेरीच्या सामान्यांना सुरुवात होणार असून आता या स्पर्धेत हाँगकाँगच्या क्रिकेट संघाचाही समावेश झालेला आहे. हाँगकाँग हा आशिया कप मधला सहावा संघ ठरलाअसून त्यास अ गटात स्थान मिळाले आहे. त्यामुळे पाकिस्तानानंतर आता हाँगकाँगचा क्रिकेट संघ देखील भारतासोबत क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहे.
३१ ऑगस्ट रोजी हाँगकाँगची (HongKong) भारताशी (India) लढत होणार आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात हाँगकाँगने आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या यूएईचा ८ गडी राखून पराभव केला. हाँगकाँगने या विजयासह आशिया कपमधील आपल स्थान निश्चित केले. हाँगकाँगचा संघ चौथ्यांदा आशिया कपमध्ये खेळणार आहे. यापूर्वी हाँगकाँगने २००४, २००८आणि २०१८ मध्ये आशिया चषकात प्रवेश केला होता. मात्र टी-२० फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच हाँगकाँगचा संघ आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणार आहे.
हाँगकाँग पात्र झाल्याने २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतील दोन्ही गटांचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारत, पाकिस्तान (Pakistan) आणि हाँगकाँग अ गटात आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश ब गटात आहेत. आयसीसी क्रमवारीत हाँगकाँग सध्या २३ व्या क्रमांकावर आहे. असे असतानाही हाँगकाँगने सलग तीन सामने जिंकून आशिया चषकासाठी पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे. आता भारत पाकिस्तान सामन्यानंतर हाँगकाँग संघ देखील भारताशी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहे
आशिया कप २०२२ चे दोन्ही गट :
अ गट – भारत, पाकिस्तान, हाँगकाँग
ब गट – श्रीलंका, बांगलादेश अफगाणिस्तान
आशिया कप 2022 चे वेळापत्रक :
२७ ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
२८ ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान
३० ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
३१ ऑगस्ट – भारत विरुद्ध हाँगकाँग
१ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
२ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग