Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prince William यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय; अजिंक्य रहाणेने सांगितल्या लंडनमधील आठवणी

Prince William : भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे याला लंडनमध्ये प्रिन्स विल्यम यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याची अनोखी संधी मिळाली. 'द रॉयल फाऊंडेशन' च्या उपक्रमांतर्गत आणि आगामी 'अर्थशॉट प्राइज' पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 14, 2026 | 05:24 PM
Prince William यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय; अजिंक्य रहाणेने सांगितल्या लंडनमधील आठवणी

Prince William यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय; अजिंक्य रहाणेने सांगितल्या लंडनमधील आठवणी

Follow Us
Follow Us:
  • सौरव गांगुली, ब्रायन लाराही सहभागी
  • क्रिकेटसोबत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश
  • १७ नोव्हेंबरला मुंबईत पुरस्कार सोहळा
 

भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे याला लंडनमध्ये प्रिन्स विल्यम (Prince William) यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याची अनोखी संधी मिळाली. बकिंगहॅम पॅलेसच्या पार्श्वभूमीवर ‘द मॉल’ येथे झालेल्या मैत्रीपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात रहाणेसह भारत आणि इंग्लंडमधील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला. या अनुभवाला रहाणेने ‘अविस्मरणीय’ असे संबोधले आहे.

‘द रॉयल फाऊंडेशन’ च्या उपक्रमांतर्गत आणि आगामी ‘अर्थशॉट प्राइज’ पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने क्रिकेट आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सौरव गांगुली, ब्रायन लाराही सहभागी

या सामन्यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा, इंग्लंडचे स्टार खेळाडू जो रूट आणि हॅरी ब्रूक यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. प्रिन्स विल्यम यांच्यासोबत वेळ घालवण्याची आणि क्रिकेटमधील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाल्याचा आनंद रहाणेने व्यक्त केला.

रहाणेने बुधवारी लिंक्डइनवरील पोस्टमधून या अनुभवाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. क्रिकेटमुळे जगभरातील अनेक सुंदर ठिकाणी जाण्याची संधी मिळाली; मात्र बकिंगहॅम पॅलेसच्या पार्श्वभूमीवर ‘द मॉल’0 येथे टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याचा अनुभव कायम स्मरणात राहील, असे त्याने म्हटले.

ICC T-20 Ranking : सरपंचने करून दाखवलं! शतकीय खेळीमुळं श्रेयसला मोठं बक्षिस, तर टी-20 मध्ये ईशान किशनची ‘बादशाही’ कायम

क्रिकेटसोबत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश

या कार्यक्रमाचा उद्देश केवळ क्रिकेटचा आनंद घेणे एवढाच नव्हता. भारत आणि ब्रिटनमधील क्रिकेटप्रेमाचा उत्सव साजरा करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

क्रिकेटमधून शिस्त, सांघिक प्रयत्न आणि सामूहिक जबाबदारीची शिकवण मिळते. पृथ्वीचे संरक्षण आणि पर्यावरणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठीही याच मूल्यांची आवश्यकता असल्याचे रहाणेने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. निसर्ग संवर्धन, स्वच्छ हवा, महासागरांचे संरक्षण, कचरा कमी करणे आणि हवामान बदलाशी संबंधित उपाययोजनांना ‘अर्थशॉट प्राइज’च्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते.

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?

१७ नोव्हेंबरला मुंबईत पुरस्कार सोहळा

प्रिन्स विल्यम यांनी २०२० मध्ये सुरू केलेल्या ‘अर्थशॉट प्राइज’चा उद्देश पर्यावरणविषयक नाविन्यपूर्ण उपाय शोधणे, त्यांना मान्यता देणे आणि त्यांना पाठिंबा देणे हा आहे. या पुरस्काराची सहावी आवृत्ती 17 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.

लंडनमधील या विशेष कार्यक्रमानंतर आपल्या शहरात ‘अर्थशॉट प्राइज’चे स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे रहाणेने सांगितले. क्रिकेटच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अनुभव त्याच्यासाठी खास ठरला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजिंक्य रहाणेने लंडनमध्ये कोणासोबत क्रिकेट खेळले?

    Ans: अजिंक्य रहाणेने लंडनमध्ये प्रिन्स विल्यम यांच्यासोबत मैत्रीपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात सहभाग घेतला.

  • Que: जिंक्य रहाणे आणि प्रिन्स विल्यम यांच्यातील क्रिकेट सामना कुठे खेळवण्यात आला?

    Ans: हा सामना बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर असलेल्या ‘द मॉल’ येथे खेळवण्यात आला.

  • Que: अर्थशॉट प्राइज २०२६ चा पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: अर्थशॉट प्राइजचा सहावा पुरस्कार सोहळा १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.

Web Title: Ajinkya rahane prince william cricket london earthshot prize mumbai rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Brian Lara
  • Saurabh Ganguly

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.