Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

Ajit Agarkar wants to step down From as Chief Selector: अजित आगरकर यांचा कार्यकाळ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. वृत्तानुसार, आगरकर यांनी स्वतःहून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 19, 2026 | 06:05 PM
Ajit Agarkar resigns From as Chief Selector

Ajit Agarkar resigns From as Chief Selector

Follow Us
Follow Us:
  • अजित आगरकरांचा मोठा निर्णय
  • Chief Selector पदावरून एक्झिट?
  • समोर आलं मोठं कारण
बीसीसीआयची वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. यानंतर, भारतीय क्रिकेट संघाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आता नवीन मुख्य निवडकर्त्याच्या शोधात आहे. यापूर्वी असे वृत्त होते की, बीसीसीआय आगरकर यांचा करार वाढवणार नाही. मात्र, सध्याच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनीच आपला कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आता या पदावर पुढे कार्यरत राहण्याची इच्छा नाही.दरम्यान, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही अजित आगरकर यांच्या भविष्याबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Davis Cup 2026: पहिला सेट एकतर्फी, दुसऱ्यातही गेम ओव्हर! सरळ सेटमध्ये सुमित नागलचा पराभव; भारताचं आव्हान संपलं

अजित आगरकर यांनी स्वतः दिला पदाचा राजीनामा

बीसीसीआय लवकरच नवीन मुख्य निवडकर्त्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू करणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अजित आगरकर यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे की, त्यांना आता मुख्य निवडकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा नाही. आगरकर यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, अजित यांनी बीसीसीआयला आपला हा निर्णय कळवला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत, कारण त्यांचा करार ४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.

काही महिन्यांपूर्वी, बीसीसीआय अजित आगरकर यांचा करार एका वर्षासाठी वाढवण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली होती. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून या निर्णयावर चर्चा झाली होती. मात्र, लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघ सोडल्याच्या बातमीने खळबळ उडाली. यानंतर, बीसीसीआय आणि अजित आगरकर यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु झाली.

मुख्य निवडकर्त्याच्या भविष्याबद्दल देवजित सैकिया काय म्हणाले?

बीसीसीआयच्या वार्षिक सभेनंतर, बोर्ड सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना पदावर कायम ठेवायचे की हटवायचे, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळाला अजून १५ दिवस शिल्लक आहेत आणि क्रिकेटमध्ये १५ दिवस हा खूप मोठा कालावधी असतो, त्यामुळे बोर्ड योग्य वेळी आपला निर्णय जाहीर करेल. सैकिया यांनी हेही स्पष्ट केले की, या बैठकीत कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर चर्चा झाली नाही. या बैठकीनंतर, सैकिया यांनी आशिया कपच्या दोन्ही ट्रॉफी बीसीसीआय कार्यालयात आणण्याबद्दलही सांगितले .

निवडकर्त्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

बीसीसीआय लवकरच आपल्या सिनियर सिलेक्शन कमिटीसाठी नवीन अध्यक्ष शोधण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. याव्यतिरिक्त, बीसीसीआय ज्यूनियर सिलेक्शन कमिटीमधील सर्व पाच पदांसाठी निवडकर्त्यांच्या शोधात आहे. देवजित सैकिया यांनी सांगितले की, त्यांना ज्यूनियर सिलेक्शन कमिटीसाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले असून, ही प्रक्रिया पुढील दोन आठवड्यांत पूर्ण केली जाईल.

पुढील मुख्य निवडकर्ता कोण असेल?

२०२३ मध्ये अजित आगरकर यांची भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य निवडकर्तापदी नियुक्ती झाली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. आगरकर यांची जागा कोण घेणार, हा प्रश्न सर्वांनाच आहे. वृत्तानुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल या शर्यतीत आघाडीवर आहेत.

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली

Web Title: Ajit agarkar wants to step down as chief selector bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • bcci
  • BCCI India
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
1

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली
2

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
3

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

BCCI Centenary Year : BCCIची वार्षिक बैठक संपली, बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात
4

BCCI Centenary Year : BCCIची वार्षिक बैठक संपली, बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.