
Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या 'पदकाचा' मानकरी
भारताने अफगाणिस्तानला तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० असे क्लीन स्वीप केले. या मालिकेत चांगली कामगिरी केल्याचे फळ अष्टपैलू अक्षर पटेल (Akshar patel) ला मिळाले आहे. या मालिकेतील ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज’ चा बहुमान नुकताच त्याला देण्यात आला. हेड फिजियो कमलेश जैन यांनी अक्षरला हे पदक सोपवले.
अक्षरने तीन सामन्यात चार विकेट घेत संपूर्ण मालिकेत आपला दबदबा कायम राखला. त्याने अखेरच्या सामन्यात तीन षटकांत अवघ्या ९ धावांवर अफगाणिस्तानचे दोन गडी टिपले होते. भारताने हा सामना १२७ धावांनी जिंकला होता. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डा (बीसीसीआय)ने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कमलेश जैन सांगतात की, मित्रांनो, मालिका जिंकल्याबाबत अभिनंदन. सिरीजच्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ बाबत बोलायचे झाले तर हा तो खेळाडू आहे, जो पडद्याच्या मागे व खेळादरम्यान गुपचूप आपले काम करून जातो. मग पॉवर प्लेमधील महत्त्वाची ओव्हर असो, वा पॉवर प्लेच्या अखेरीस गोलंदाजी करायची असो, तो नेहमीच तयार असतो. तो येतो व गुपचूप आपले काम करतो, मग ३० यार्डच्या सर्कलमधील क्षेत्ररक्षण असो वा सिमारेषेजवळचा उत्तुंग झेल, त्याला आपले काम माहित असते. त्याचा वेगळाच सिद्धांत असून तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला अक्षर पटेल आहे.
हा सन्मान स्विकारल्यानंतर अक्षर थोडा भावूक झाला. तो म्हणाला की, आम्ही तीनही सामन्यात चांगली कामगिरी केली. आम्ही तेच केले ज्यावर चर्चा केली होती. एका संघाच्या रुपात मला माझ्या संघाचा गर्व आहे. आता आम्ही आशियाई स्पर्धेतही तिच कामगिरी कायम राखत आपली विजयी घौडदौड कायम राखणार आहोत.
जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे आशियाई स्पर्धेदरम्यान क्रिकेट संघाच्या सोबत नाहीत, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारतीय क्रिकेटपटूंनी या मालिकेतील विजय मागे सारत आपले लक्ष आशियाई स्पर्धेतील सामन्यांवर लावायला हवा, कारण भारत सध्याचा सुवर्ण पदक विजेता आहे. गंभीर म्हणतात की, आशियाई स्पर्धेसाठी संपूर्ण भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा. माझा एकच संदेश आहे की, आता नव्या मालिकेवर आपले लक्ष केंद्रीत करा.
BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती