Maharashtra Olympic Association: आगामी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणूक आणि कारभाराबाबत सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर पसरवले जाणारे काही आरोप व गैरसमज खोटे आहेत, असे स्पष्टीकरण ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगांवकर यांनी दिले आहे. तसेच, या आरोपांमध्ये कोणताही तथ्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
असोसिएशनच्या नियमावलीनुसार, आगामी चार वर्षांसाठी (साल २०२५ ते २०२९) निवडणूक घेण्यासाठी माजी जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, निवडणुकीत उद्भवणाऱ्या कोणत्याही हरकतींवर कार्यकारी मंडळ निर्णय घेईल, असेही शिरगांवकर यांनी स्पष्ट केलं आहे.
PAK vs SL: श्रीलंका-पाकिस्तानसाठी आज ‘करो या मरो’ची लढत; हेड-टू-हेडमध्ये जाणून घ्या कोण आहे वरचढ
शिरगांवकर म्हणाले की, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकारीणी समिती सदस्यांची निवडणूक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ४.०० वाजता रॉयल कॅनॉट बोट क्लब, बोट क्लब रोड, पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (नोंदणी क्रमांक एफ ६१६२, मुंबई) ही एक सार्वजनीक न्यास संस्था असून, असोसिएशनच्या घटनेनुसार दर चार वर्षांनी निवडणूक घेणे अनिवार्य आहे. मागील पदाधिकारी व कार्यकारीणीचा कार्यकाल संपत आला असून, नियमावलीनुसार पुढील कार्यकारीणीची निवड करण्यासाठी संस्थेची निवडणूक विहित कालावधीत घेणे आवश्यक असल्यामुळे ही निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी संबंधित नसणाऱ्या काही लोकांनी संघटनेबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही आणि पुराव्याशिवाय खोटे आरोप करण्यात आले आहेत. संघटनेची प्रतिमा त्रयस्थ लोकांकडून मलीन होत असल्याचे लक्षात घेऊन, या बाबतीत संघटनेच्या बैठकीत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे, असेही शिरगांवकर यांनी स्पष्ट केले.
नामदेव शिरगांवकर म्हणाले की, माजी खासदार रामदास तडस यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत,गेल्या पाच वर्षांमध्ये सलग ३ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र अव्वल राहिला असून, सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅटट्रिकचा विक्रम महाराष्ट्राने केला आहे.
Asia cup 2025 : पाकिस्तानसह श्रीलंकन खेळाडूंच्या रडारवर अभिषेक शर्मा! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
तसेच, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनबाबत खेळाडूंनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही, मात्र तथाकथित वादग्रस्त क्रीडा संघटकांनी वैयक्तिक आकांक्षांसाठी खोटे आरोप केले, आणि यावर संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. २०२५ ते २०२९ या कार्यकाळासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकारीणी समिती सदस्यांची निवडणूक आगामी आहे. या निवडणुकीस २२ क्रीडा राज्य संघटना मतदानास पात्र आहेत. मात्र, खालील पाच राज्य संघटना अपात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन
हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र
महाराष्ट्र स्टेट कबड्डी असोसिएशन
स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद