
table Tennis Competition
जिल्हा टेबल टेनिसमध्ये विजेते नीरज, अनन्या विजेते
चौथ्या स्पर्धेत अनन्याचा आहाना गोडबोलेवर
नीरजचा अव्वल मानांकित आर्यन वानखेडेवर विजय
पुणे/Table Tennis: सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नीरज नांदेडे, अनन्या पाटील आणि अनिल निंबाळकर यांनी दमदार कामगिरी करत आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.प्रभात रोड येथील सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात चौथ्या मानांकित अनन्या पाटीलने अंतिम फेरीत सहाव्या मानांकित आहाना गोडबोलेचा पाच गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत ८-११, १०-१२, ११-७, ११-६, ११-८ असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
अनन्याने सुरुवातीचे दोन्ही गेम गमावल्यानंतर उत्कृष्ट पुनरागमन करत सलग तीन गेम जिंकले आणि सामना आपल्या बाजूने वळवला. अनन्या एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिक्षण घेत असून, मार्तंड बिनीवाले टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक मार्तंड बिनीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
नीरजचा अव्वल मानांकित आर्यनला धक्का
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात बिगर मानांकित नीरज नांदेडेने अव्वल मानांकित आर्यन वानखेडेचा ११-६, ११-७, ९-११, ११-९ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. नीरजने सुरुवातीचे दोन्ही गेम जिंकून सामन्यात आघाडी घेतली. आर्यनने तिसऱ्या गेममध्ये पुनरागमनाचा प्रयत्न केला; मात्र चौथ्या गेममध्ये नीरजने संयमी खेळ करत सामना जिंकला.नीरज बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून, क्रीडा प्रबोधिनी अकादमीत प्रशिक्षक अनिल बांदेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
Pune Table Tennis Competition: स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात वरदन कोलतेचा सनसनाटी विजय
६० वर्षांवरील प्रौढ गटाच्या अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित अनिल निंबाळकर यांनी अव्वल मानांकित रोहिंटन तोडीवाला यांचा १२-१०, १२-१४, १०-१२, १२-१०, ११-४ असा पराभव करत विजेतेपद मिळवले. चुरशीच्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. मात्र निर्णायक पाचव्या गेममध्ये निंबाळकर यांनी आपला अनुभव पणाला लावत स्पष्ट वर्चस्व मिळवले.
उपांत्य फेरी
अनन्या पाटील [४] वि.वि. दिया शिंदे [१] — ११-९, ११-८, ८-११, ३-११, ११-७
आहाना गोडबोले [६] वि.वि. नीरजा देशमुख [२] — ४-११, १५-१७, ११-९, १३-११, ११-८
अंतिम फेरी
अनन्या पाटील [४] वि.वि. आहाना गोडबोले [६] — ८-११, १०-१२, ११-७, ११-६, ११-८
Table Tennis: १ गेम गमावला अन् मग रचला इतिहास! उपेंद्र मुळेने सोलापूरच्या अनंत कुलकर्णीला धूळ चारली
१५ वर्षांखालील मुले
उपांत्य फेरी :
आर्यन वानखेडे [१] वि.वि. वरदान कोलते [५] — ११-४, ८-११, ११-७, ८-११, ११-८
नीरज नांदेडे वि.वि. वरद माळवदकर [७] — ११-८, ११-९, ११-७
अंतिम फेरी
नीरज नांदेडे वि.वि. आर्यन वानखेडे [१] — ११-६, ११-७, ९-११, ११-९
अशा प्रकारे चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नीरज नांदेडे, अनन्या पाटील आणि अनिल निंबाळकर यांनी आपापल्या गटात विजेतेपदावर मोहोर उमटवली.