Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मर्डेका ११८ टॉवर सर करत अपर्णा उपाध्याय यांची ऐतिहासिक कामगिरी; २८४५ पायऱ्या ४८ मिनिटांत पूर्ण

Aparna Upadhyay Climb Merdeka 118 Tower Running: पुण्याच्या अपर्णा उपाध्याय यांनी मलेशियातील मर्डेका ११८ टॉवरची २८४५ पायऱ्यांची चढाई ४८ मिनिटे ३६.३२७ सेकंदांत पूर्ण केली. या शर्यतीत त्या एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरल्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 03, 2026 | 09:15 PM
Aparna Upadhyay

Aparna Upadhyay

Follow Us
Follow Us:
  • ७८ मीटर उंच टॉवरची आव्हानात्मक चढाई
  • शर्यत ४८ मिनिटे ३६.३२७ सेकंदांत पूर्ण
  • अपर्णा ठरल्या एकमेव भारतीय महिला
पुणे: मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या अत्यंत आव्हानात्मक ‘आयएचएच स्काय रेस’मध्ये पुण्याच्या ४३ वर्षीय अपर्णा उपाध्याय यांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत मानल्या जाणाऱ्या ६७८.९ मीटर (२२२७ फूट) उंच ‘मर्डेका ११८’ टॉवरचे ११८ मजले आणि तब्बल २८४५ पायऱ्या अवघ्या ४८ मिनिटे ३६.३२७ सेकंदात चढून त्यांनी ही शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली. या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ही कामगिरी करणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरल्या आहेत.

National Sports Day: जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा उत्साहात; १९, १७ आणि १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग

‘टॉवर रनिंग वर्ल्ड असोसिएशन’ (TWA) अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘व्हर्टिकल रनिंग’ (गगनचुंबी इमारतींच्या पायऱ्या चढण्याची शर्यत) प्रकारात अपर्णा गेल्या ५ वर्षांपासून सक्रिय आहेत. मर्डेका ११८ च्या आधी, २० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी सिंगापूर येथील ३९ मजली व १२५६ पायऱ्यांचा ‘फ्रेझर टॉवर’ सलग तिसऱ्यांदा सर केला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत (२२ ऑगस्ट रोजी) क्वालालंपूर गाठत त्यांनी ‘मर्डेका ११८’ टॉवरची शर्यत पूर्ण केली. अवघ्या ४८ तासांच्या कालावधीत दोन अत्यंत खडतर आंतरराष्ट्रीय शर्यती पूर्ण करून त्यांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीची आणि मानसिक कणखरतेची प्रचिती दिली.

डोंबिवली ते जागतिक स्कायस्क्रेपर प्रवास

मूळच्या मुंबईतील डोंबिवली येथे शिक्षण घेतलेल्या अपर्णा २०२० पासून पुणेकर झाल्या. या आव्हानात्मक शर्यतींसाठी त्यांनी पुण्यातील हडपसर भागातील ‘गेटवे टॉवर १००’ येथे नियमित सराव केला. उच्चशिक्षणासाठी सिंगापूरला गेल्यानंतर त्यांनी व्हर्टिकल रनिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. सध्या ‘टॉवर रनिंग वर्ल्ड असोसिएशन’च्या जागतिक क्रमवारीत नोंदणीकृत १११ महिला धावपटूंमध्ये अपर्णा यांनी ९८ वे मानांकन पटकावले आहे.

अपर्णा उपाध्याय यांची उल्लेखनीय कामगिरी

  • पिंग आन फायनान्शियल सेंटर, चीन (जानेवारी २०२५): जगातील पाचव्या क्रमांकाच्या ५४७.६ मीटर उंच टॉवरचे ११६ मजले आणि ३२०१ पायऱ्या १ तास ०५ मिनिटे ११ सेकंदात पूर्ण करून महिला गटात १७ वे स्थान.
  • तैपेई १०१ रन-अप, तैवान (२०२५): ५०८ मीटर उंच इमारतीवर यशस्वी चढाई.
  • सिंगापूर लोकल चॅम्पियनशिप (जुलै २०२५): अवघ्या ७ मिनिटांत ३९ मजली टॉवर चढून दुसरे स्थान (पोडियम फिनिश).
  • केएल टॉवर, मलेशिया (नोव्हेंबर २०२५): ४२१ मीटर उंच टॉवरवर यशस्वी चढाई.
  • एव्हरेस्ट बेस कॅम्प (नोव्हेंबर २०२५): बेस कॅम्प मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण.
 

आंतरराष्ट्रीय टॉवर रनर, अपर्णा उपाध्याय म्हणाले की, ‘अशा साहसी क्रीडा प्रकारांमध्ये अधिकाधिक महिलांनी पुढे यायला हवे. त्यामुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढेल आणि आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ मिळेल. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून पुढे जाते, तेव्हा कोणतीही इमारत खूप उंच वाटत नाही आणि कोणतेही ध्येय आवाक्याबाहेर राहत नाही. सुरक्षित मार्ग निवडण्याचा सल्ला समाज देईल, पण तुमची खरी क्षमता तुम्हाला उंच भरारी घेण्यास प्रवृत्त करते.’

China Masters मध्ये श्रीकांतची कमाल! चुरशीच्या लढतीत व्हिक्टर लाईला चारली धूळ; शानदार विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक

Web Title: Aparana upadhyay merdeka 118 tower climb 2845 stairs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Maharashtra. Pune
  • Sports News

संबंधित बातम्या

National Sports Day: जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा उत्साहात; १९, १७ आणि १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग
1

National Sports Day: जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा उत्साहात; १९, १७ आणि १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग

मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम
2

मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत
3

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला
4

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.