Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashes 2025 : १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले! ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅरीने केला ‘हा’ भीम पराक्रम

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना अ‍ॅलेडलेड येथे खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक कणाऱ्या अ‍ॅलेक्स कॅरीने खास कामगिरी केली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 19, 2025 | 04:17 PM
Ashes 2025: It happened for the first time in 12 years! Australia's Alex Carey achieved 'this' remarkable feat.

Ashes 2025: It happened for the first time in 12 years! Australia's Alex Carey achieved 'this' remarkable feat.

Follow Us
Close
Follow Us:

Alex Carey Create History : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची अ‍ॅशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अ‍ॅलेडलेड येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यावर चांगलीच घट्ट पकड निर्माण केली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा संघ २८६ धावांवर आटोपला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावाच्या आधारावर ८५ धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात  ४ बाद २७१ धावा केल्या आणि  ३५६ धावांची आघाडी घेतली आहे. यासामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीने खास कामगिरी केली आहे.

हेही वाचा : IND vs SA 5th T20I: अहमदाबादमध्ये संजू सॅमसन रचणार इतिहास? ‘ही’ गोष्ट करताच या दिग्गजांच्या क्लबमध्ये करणार एंट्री

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या डावात देखील आपली दहशत कायम राखली.  चार विकेट गमावल्यानंतरही, संघाने २७१ धावा केल्या   आणि त्यांची आघाडी ३५६ धावांपर्यंत पोहचवली. या सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीची कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची ठरली आहे.

अ‍ॅलेक्स कॅरीचे दमदार शतक

अ‍ॅलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकवले आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. त्याने १४३ चेंडूंचा सामना करत १०६ धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीदरम्यान कॅरीने ८ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३७१ धावांचा मोठा टप्पा गाठला होता.

दुसऱ्या डावातही कॅरीची शानदार कामगिरी

दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. जॅक वेदरल्ड फक्त १ धाव करून बाद झाला. तर मार्नस लाबुशेन फक्त १३ धावा करून माघारी गेला. त्यानंतर उस्मान ख्वाजाने ५१ चेंडूत ४० धावा करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अ‍ॅलेक्स कॅरीने पुन्हा एकदा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संयमी फलंदाजी केली. तो सध्या क्रीजवर असुन त्याने ९१ चेंडूत ५२ धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाला अधिक भक्कम दिशेने पोहचवले आहे.

हेही वाचा : Ashes 2025 : अ‍ॅडलेडमध्ये Travis Head चे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू

१२ वर्षांनंतर अ‍ॅशेसमध्ये विशेष कामगिरी

अ‍ॅलेक्स कॅरीने या कसोटी सामन्यात खास कामागिरीने छाप पाडली आहे. अ‍ॅशेस कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात पन्नासपेक्षा अधिक धावा करणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक-फलंदाज बनला आहे. यापूर्वी, १९९५ मध्ये इयान हिली आणि २०१३ मध्ये ब्रॅड हॅडिन यांनी ही किमया साधली होती. जवळजवळ १२ वर्षांत प्रथमच, ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षकाने अ‍ॅशेस कसोटीच्या दोन्ही डावात पन्नासपेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे.

Web Title: Ashes 2025 for the first time in 12 years australias alex carey achieved this feat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • Alex Carey
  • Ashes 2025
  • AUS vs ENG
  • Test Match

संबंधित बातम्या

Ashes 2025-26 : अ‍ॅशेस मालिकेत इंग्लडचं नशीबचं फुटक! इंग्लिश संघ मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर, कांगारुने घेतली 356 धावांची आघाडी
1

Ashes 2025-26 : अ‍ॅशेस मालिकेत इंग्लडचं नशीबचं फुटक! इंग्लिश संघ मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर, कांगारुने घेतली 356 धावांची आघाडी

Ashes 2025 : अ‍ॅडलेडमध्ये Travis Head चे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू
2

Ashes 2025 : अ‍ॅडलेडमध्ये Travis Head चे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू

AUS vs ENG: ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून इंग्लंडला दिला धक्का, रोहित शर्माचा प्रभावी विक्रम मोडला!
3

AUS vs ENG: ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून इंग्लंडला दिला धक्का, रोहित शर्माचा प्रभावी विक्रम मोडला!

AUS vs ENG : अशाच एका चेंडूने घेतला होता एक खेळाडूंचा जीव… स्टार्कच्या त्या बाॅलने बेन स्टोक्स थोडक्यात बचावला! पहा Video
4

AUS vs ENG : अशाच एका चेंडूने घेतला होता एक खेळाडूंचा जीव… स्टार्कच्या त्या बाॅलने बेन स्टोक्स थोडक्यात बचावला! पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.