संजू सॅमसन(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 5th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना आज १९ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. लखनऊ येथील एकाना स्टेडियमवरील सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर असून भारत आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवणार आहे. शुभमन गिल या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. जर गिलला वगळण्यात आले तर त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात येऊ दिली जाऊ शकते. या सामन्यात जर संजू खेळला तर त्याला एक विक्रमाची संधी असणार आहे.
हेही वाचा : Ashes 2025 : अॅडलेडमध्ये Travis Head चे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू
जर संजू सॅमसन या सामन्यात खेळला आणि चार धावा केल्या तर तो एका खास क्लबमध्ये एंट्री करणार आहे. खरं तर, संजू सॅमसन टी-२० मध्ये ८,००० धावांचा टप्पा गाठण्यापासून केवळ चार धावा दूर आहे. संजूने ३१९ टी-२० सामन्यांमध्ये ३०२ डावांमध्ये ३०.०६ च्या सरासरीने आणि १३६.७५ च्या स्ट्राईक रेटने ७९९६ धावा फटकावल्या आहेत.
या काळात त्याने ६ शतके आणि ५१ अर्धशतके लगावली आहेत. आतापर्यंत फक्त विराट कोहली (१३५४३), रोहित शर्मा (१२२४८), शिखर धवन (९७९७), सूर्यकुमार यादव (८९७०), सुरेश रैना (८६५४) आणि केएल राहुल (८१२५) यांनीच भारतासाठी हा टप्पा पार केला आहे. आता ही संजू सॅमसनला ही संधी असणार आहे.
अहमदाबादमध्ये भारत नेहमीच प्रभावी राहिलेला आहे. या मैदानावर ७ टी २० सामने खेळले गेले आहेत. यापैकी ५ सामने भारताने जिंकले आहेत. तर दोन सामन्यात इंग्लंड संघाने भारताला पराभूत केले आहे. या विक्रमाच्या आधारे टीम इंडियाला अहमदाबादमध्ये मालिका जिंकण्याची संधी असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : श्रीलंकेने खेळला डाव! T20 World Cup साठी संघ जाहीर! वाचा कुणाची लागली लॉटरी?
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव(कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, हर्षित राणा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.






