Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अश्मिता चलिहाचा धमाका! Korea Masters Super 300 च्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

Asmita Chaliha enter korean masters badminton Supe 300 final: भारताच्या अश्मिताने कोरिया मास्टर्स सुपर 300 च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत तिने रक्षिता रामराजचा 21-13, 16-21, 21-13 असा पराभव केला. अंतिम फेरीत अश्मिताचा सामना चीनच्या हान कियानक्सीशी होईल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 08, 2026 | 06:13 PM
अश्मिता चलिहाचा धमाका! Korea Masters Super 300 च्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
Follow Us
Follow Us:
  • अश्मिता चलिहाचा धमाका
  • फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
  • दुसरा गेम हरल्यानंतर शानदार पुनरागमन
भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहाची कोरिया मास्टर्स २०२६ ( Korea Masters 2026) मध्ये प्रभावी कामगिरी सुरूच आहे. अश्मिताने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडाकेबाज प्रवेश केला आहे. शनिवारी दक्षिण कोरियातील आसन येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, अश्मिताने तीन गेमच्या अटीतटीच्या लढतीत भारताच्याच रक्षिता रामराजचा २१-१३, १६-२१, २१-१३ असा पराभव केला. या दोन भारतीय खेळाडूंमधील सामना ४८ मिनिटे चालला.

IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर

दुसरा गेम हरल्यानंतर शानदार पुनरागमन

अश्मिताने पहिला गेम २१-१३ ने जिंकून सामन्याची शानदार सुरुवात केली. मात्र, रक्षिताने दुसऱ्या गेममध्ये २१-१६ ने विजय मिळवत पुनरागमन केले आणि सामना निर्णायक गेममध्ये नेला. त्यानंतर अश्मिताने आपल्या अनुभवाचा आणि आक्रमक खेळाचा पुरेपूर फायदा घेतला. तिने निर्णायक गेममध्ये रक्षिताला कोणतीही संधी न देता २१-१३ ने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.आता जागतिक क्रमवारीत ५० व्या क्रमांकावर असलेली २६ वर्षीय अश्मिताचे लक्ष विजेतेपदावर असून , विजेतेपदासाठी तिचा सामना चीनच्या हानशी होणार आहे.

गुवाहाटीची ही खेळाडू अंतिम सामन्यात चीनच्या हान चियानक्सीशी सामना करेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम गा रामला २२-२०, १८-२१, २१-१४ असे पराभूत करून या चिनी खेळाडूने विजेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अव्वल मानांकित हिना अकेचीला २०-२२, २१-१५, २१-१९ असे पराभूत करून अश्मिताने एक मोठा उलटफेर घडवला होता. रक्षिता रामराजनेही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली . उपांत्यपूर्व फेरीत तिने चायनीज तैपेई ओपन चॅम्पियन तन्वी शर्माला १८-२१, २१-१९, २१-१८ असे पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीनंतर, महिला एकेरीमध्ये या दोन्ही भारतीय खेळाडू भारताची शेवटची आशा होत्या आणि दोघींनीही एका तासाहून अधिक काळ चाललेले सामने जिंकले.

पुरुष दुहेरीमध्ये भारताचा पराभव

पुरुष दुहेरीमधील भारताचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपला. पृथ्वी के. रॉय आणि कृष्णा प्रसाद जी या भारतीय जोडीला मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वूई यिक यांच्याकडून पारभव पत्कावा लागला. त्यांनी भारताचा २१-७, २१-८ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. कोरिया मास्टर्स सुपर ३०० स्पर्धा रविवारी ९ ऑगस्ट रोजी संपेल. या स्पर्धेचे एकूण बक्षीस २.५ लाख अमेरिकी डॉलर आहे. ही स्पर्धा २००७ मध्ये सुरू झाली आणि २०१० पर्यंत आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्तराची स्पर्धा होती, त्यानंतर २०११ मध्ये ती बीडब्ल्यूएफ ग्रँड प्रिक्स गोल्ड स्पर्धा बनली. २०१७ मध्ये ग्रँड प्रिक्स गोल्ड स्पर्धा बंद झाल्यानंतर, कोरिया मास्टर्सला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ३०० चा भाग बनवण्यात आले.

क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?

Web Title: Ashmita chaliha reaches korea masters 2026 final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Badminton
  • Final
  • South korea

संबंधित बातम्या

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता
1

Asian-games: सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय, ‘या’ संघाला दाखवला घरचा रस्ता

Asian Games : क्वार्टर फायनलमध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाला धक्का; ‘या’ संघाकडून मिळाला पराभव
2

Asian Games : क्वार्टर फायनलमध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाला धक्का; ‘या’ संघाकडून मिळाला पराभव

Asian Games : पुरुष बॅडमिंटन संघाने क्वॉर्टर फायनल गाठले; तुल्यबळ बांगलादेशला 3-0 ने नमवले
3

Asian Games : पुरुष बॅडमिंटन संघाने क्वॉर्टर फायनल गाठले; तुल्यबळ बांगलादेशला 3-0 ने नमवले

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.