Asia Cup 2025: Bangladesh win toss, elect to bat in do-or-die match; Afghanistan spin will be a challenge
Bangladesh vs Afghanistan : आशिया कप २०२५ मधील ९ वा सामना आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. आज हा सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमव खेळला जाणार आहे. या सामान्यापूर्वी बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अफगाणिस्तान संघ प्रथम गोलंदाजी करण्यास उतरणार आहे. दोघेही ग्रुप बी मध्ये आहेत. दोन्ही संघांना हा सामना महत्वाचा असणार आहे.
हेही वाचा : IND vs PAK: पराभवानंतर पाकड्यांची पातळी घसरली, माजी क्रिकेटपटूने लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमार यादवला दिली शिवी
लिटन दासच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघ या स्पर्धेत २ सामने खेळला आहे. या मध्ये पहिला सामाना हाँगकाँगविरुद्ध ७ विकेट्सने जिंकला होता, तर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता बांगलादेशला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असणार आहे. तर अफगाणिस्तानचा या स्पर्धेत एकच सामना हाँगकाँग विरुद्ध झाला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी पराभव केला होता.
हेही वाचा : PM Modi Birthday : फुटबॉलपटू मेस्सीकडून पंतप्रधान मोदींना स्वाक्षरी केलेली जर्सी भेट; दिला ‘हा’ खास संदेश
बांगलादेश संघ खालीलप्रमाणे
बांगलादेश:
लिटन दास (कर्णधार)तनजीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद हृदोय, महेदी हसन, जाकर अली, शमीम हुसेन, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकिब,शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, सैफ हसन,नसूम अहमद, मोहम्मद सैफुद्दीन, तस्किन अहमद, नुरुल हसन
अफगाणिस्तान संघ:
रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, इब्राहिम जाद्रान, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जन्नत, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गजनफर, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, मोहम्मद इशाक, शराफुद्दीन अशरफ आणि गुलबदीन नायब.
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, इतकी प्रसिध्दी त्याने मिळवून ठेवली आहे. आता या दिग्गज फुटबॉलपटूकडून पंतप्रधान मोदींसाठी स्वाक्षरी केलेली जर्सी पाठवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मेस्सीने ही जर्सी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. क्रीडा उद्योजक आणि मेस्सीचे टूर प्रमोटर सतद्रु दत्ता लिओनेल मेस्सीची भेट घतली. यावेळी मेस्सीकडून त्यांना पंतप्रधान मोदींसाठी ही जर्सी देण्यात आली.