फुटबॉलपटू मेस्सीकडून पंतप्रधान मोदींना जर्सी भेट(फोटो-सोशल मीडिया)
Messi gifts PM Modi a signed jersey : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, इतकी प्रसिध्दी त्याने मिळवून ठेवली आहे. आता या दिग्गज फुटबॉलपटूकडून पंतप्रधान मोदींसाठी (PM Modi)स्वाक्षरी केलेली जर्सी पाठवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मेस्सीने ही जर्सी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. क्रीडा उद्योजक आणि मेस्सीचे टूर प्रमोटर सतद्रु दत्ता लिओनेल मेस्सीची भेट घतली. यावेळी मेस्सीकडून त्यांना पंतप्रधान मोदींसाठी ही जर्सी देण्यात आली.
सतद्रु दत्ता यांच्याकडून सांगण्यात आले की, “पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मेस्सीकडून जर्सी पाठवण्यात आली आहे. मेस्सी भारत दौऱ्यावर आल्यावर आम्ही पंतप्रधानांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. मेस्सी बऱ्याच वर्षांनंतर भारतात येणार आहेत. तो पहिल्यांदाच दिल्ली आणि मुंबईला येईल. मेस्सी १३ डिसेंबर रोजी कोलकात्याला येणार आहे. तो दुसऱ्या दिवशी मुंबईत पोहचणार आहे. तो १५ डिसेंबर रोजी दिल्लीला पोहचणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहील.”
लिओनेल मेस्सी, पंतप्रधान मोदींचा वाढदिवस, भारतीय फुटबॉल, सत्रजित दत्ता, इंडियन सुपर लीग, आसाम चहा, बॉलिवूड, अमिताभ बच्चन, अर्जेंटिना संघ, हॉकी, भारतीय पाककृती, फुटबॉल स्टेडियम, युवा प्रेरणा, विश्वविजेता, ऑलिंपिक, क्रिकेट, भारताची कामगिरी, स्वाक्षरी केलेली जर्सी,
सतद्रु दत्ता पुढे म्हणाले की, “आम्ही मेस्सीसोबत भारतीय फुटबॉलवर चर्चा केली. तसेच आम्ही इंडियन सुपर लीगबद्दल बोललो. मेस्सीला हे देखील माहित आहे की भारतात हॉकी खूप लोकप्रिय खेळ आहे. अर्जेंटिनाचा संघ देखील हॉकी खेळतो, म्हणून त्याला या खेळाबद्दलही माहिती आहे. यानंतर मी मेस्सीला बॉलिवूडबद्दल देखील माहिती दिली. जेव्हा मेस्सी हा सौदी अरेबियामध्ये खेळला होता तेव्हा बॉलीवूड स्टार अभिनेते अमिताभ बच्चन त्याला भेटले होते. मी मेस्सीशी शतकातील सुपरस्टारबद्द देखील चर्चा केली.”
शताद्रु दत्ताने यांनी फुटबॉल स्टारला मेस्सीला आसाम चहा भेट दिला आहे. तो म्हणाला की, “मेस्सीला अर्जेंटिनाचा चहा खूप आवडतो. मी मेस्सीला आसाम चहा दिला आहे. मी त्याला येथील चहाची खासियत देखील सांगितली. त्यावर मेस्सी बोलला, की तो नक्कीच त्याचा आस्वाद घेणार. यासोबतच मी त्याला भारतीय जेवणाची वैशिष्ट्ये आणि विविधता याबद्दल देखील माहिती दिली.”
मेस्सीच्या भेटीमुळे फुटबॉलला नवी प्रेरणा
दत्ता यांचा असा विश्वास आहे की, मेस्सीच्या भारत दौऱ्यामुळे भारतीय फुटबॉलळलला चालना मिळण्यास मदत होईल. ते म्हणाले, “भारतमध्ये उत्तम फुटबॉल स्टेडियम असून मेस्सीच्या भारत भेटीमुळे तरुणांना प्रेरणा देखील मिळेल. तो एक विश्वविजेता खेळाडू आहे. भारत देखील सध्या खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. ऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. भारतीय संघ क्रिकेटमध्ये देखील चमकदार खेळताना दिसत आहे. आम्हाला आशा आहे की भारत लवकरच फुटबॉलमध्येदेखील चमकदार कामगिरी करणार”