गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
एक खेळाडू म्हणून, गौतम गंभीर २००७ मध्ये टी२० वर्ल्ड कप, २०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप आणि २०१० मध्ये आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य राहिला होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी मार्च २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २८ सप्टेंबर २०२० रोजी आशिया कप आपल्या नावे केला आहे.
हेही वाचा : अॅशेस मालिकेपूर्वीच स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा! १४ वर्षांच्या कारकिर्दीला मिळाला विराम
भारतीय माजी क्रिकेपटू रवी शास्त्री यांनी खेळाडू म्हणून आयसीसी ट्रॉफी आणि आशिया कप (दोनदा) आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिया कप (२०१८ मध्ये) जिंकला आहे, परंतु मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना आयसीसी ट्रॉफी कधी जिंकता आली नाही. जुलै २०२४ मध्ये गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपडची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांच्या मुख्य प्रशिक्षक नेतृत्वाखाली भारताने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्व सामने जिंकले आहेत. २०२५ च्या आशिया कपमध्ये सर्व सात सामने जिंकण्यापूर्वी, भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर देखील आपले नाव कोरले आहे. गौतम गंभीरने एक उत्कृष्ट विजयी विक्रम कायम ठेवला.
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांचे सर्वच सामने जिंकले होते. तसेच भारतीय संघाने टी२० आशिया कपमध्येही सलग सात सामने जिंकले आणि ट्रॉफीवर नाव कोरले आहे. या विजयासह, भारताने नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद उंचावले आहे. भारतीय संघ आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.
हेही वाचा : IND vs PAK Final : अर्शदीप सिंगचा ट्रोलिंगचा अनोखा खेळ! पाकिस्तान खेळाडूंची पुरती केली बेइज्जती; पहा Video
पाकिस्तानी मंत्री आणि एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर विजेत्या संघाला ट्रॉफीच प्रदान करण्यात आली नाही. रविवारी आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताच्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर झालेल्या रोमांचक विजयानंतर मैदानात अनेक मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्याचा शेवट विजेत्या संघांनी ट्रॉफीशिवाय विजय साजरा करण्यात झाला.






