भारताचा आशिया कप स्पर्धेत विजय(फोटो-सोशल मीडिया)
Who is Wajama Ayubi, the celebrator of India’s happiness? आशिया कप २०२५ चा अंतिम सामना रविवारी,२८ सप्टेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करून जेतेपदावर नाव कोरले. या तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली. भारत जिंकल्यानंतर देशभरातील क्रिकेट चाहत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. रविवारी रात्री उशिरापर्यंत भारतीय चाहते रस्त्यावर उतरून हा आनंद साजरा करताना दिसत होते. भारतीय चाहत्यांच्या आनंदात, एका परदेशी महिला सामील झाली होती. तिने केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने भारताला तिचा दुसरा आवडता संघ संबोधले आहे आणि लिहिले की, “आम्ही चॅम्पियन आहोत.” त्यासोबत तिने हसणारा इमोजी जोडला आणि त्या पुढे लिहिले की भारतीय खेळाडूंनी काल्पनिक ट्रॉफीसह आनंद साजरा केला.
हेही वाचा : अॅशेस मालिकेपूर्वीच स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा! १४ वर्षांच्या कारकिर्दीला मिळाला विराम
भारताकडून पाकिस्तान पराभूत होताच दुबईमध्ये आतषबाजीचा आवाज घुमू लागला. वझ्मा अयुबीकडून या क्षणाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये ती भारतीय ध्वजासह आनंद साजरा करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओसोबत, वाजमा अयुबीने लिहिले आहे की, “आम्ही चॅम्पियन आहोत. माझ्या दुसऱ्या आवडत्या संघाने आशिया कप २०२५ जिंकला.” पुढे तिने म्हटले की, “नाही, तुमची ट्रॉफी ठेवा. त्याऐवजी, त्यांनी एका काल्पनिक ट्रॉफीसोबत आनंद साजरा केला, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर जोरदारपणे दबदबा गाजवता तेव्हा तुमची एअरबोर्न ट्रॉफी जास्त वजनदार असते.”
Morning reminder: WE ARE THE CHAMPIONS. My second favorite team won the AsiaCup25 and still said, “Nah, keep your trophy.” 😂 They celebrated with an imaginary one instead; because when you dominate your opponents that hard, even your air trophy carries more weight 😉👏🏻 #INDvsPAK… pic.twitter.com/8sxjeqzzaQ — Wazhma Ayoubi 🇦🇫 (@WazhmaAyoubi) September 29, 2025
वाजमा अयुबीची ही आयसीसी २०२३ विश्वचषकादरम्यान देखील चर्चेत आली होती. त्या काळात तिच्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि तीला मोठा प्रतिसाद देखील मिळाला होता. वाजमा अयुबी अफगाणिस्तानची असून ती भारतीय संघाला पाठिंबा देताना देखील दिसून येते. वाजमा अयुबी एक व्यावसायिक महिला आहे. तसेच ती एक प्रभावशाली आणि सामाजिक कार्यकर्ती देखील आहे. ती दुबईमध्ये वास्तव्यास आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अयुबी मॉडेलिंगमध्ये करिअर करत आहे.
हेही वाचा : IND vs PAK Final : कोच गौतम गंभीरची इतिहासाला गवसणी! ‘ही’ कामगिरी करणारा तो जगातील ठरला पहिलाच खेळाडू…
रविवारी, २८ सप्टेंबर रोजी आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले होते. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १४६ धावा केल्या होत्या. भारताकडून कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या. प्रतिउत्तरात तिलक वर्माच्या ५३ चेंडूत नाबाद ६९ धावांच्या जोरवार भारताने हे लक्ष्य सहज पार केले आणि भारताने आशिया कपचे विजेतेपद मिळवले.