Asia Cup 2025: India-Pakistan match will happen! BCCI's clear stance..
Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा ९ ते २९ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयकडे आहे. दरम्यान, आशिया कपचे वेळापत्रकी देखील जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. आशिया कप वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, भारतीय संघ पाकिस्तानसोबत सामना खेळणार नसल्याची चर्चा होताना दिसत होती. अशातच आता बीसीसीआयने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
बीसीसीआयने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील हा सामना नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत त्याला हिरवा कंदील दिला आहे.
हेही वाचा : Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण विभागीय संघ जाहीर! कर्णधारपदी तिलक वर्माची लागली वर्णी
आयएएनएसच्या वृत्तानुसार, ढाका येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत आशिया कप २०२५ चे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते, ज्यामध्ये बीसीसीआयने देखील आपली सहमती दर्शवली होती. अशा परिस्थितीत, आता बीसीसीआय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापासून माघार घेणार नाही आणि सामना जाहीर वेळापत्रकानुसारच होणार आहे. बीसीसीआय देखील या स्पर्धेचे यजमान आहे. अशा परिस्थितीत, आता बोर्ड नियोजित वेळापत्रकापासून मागे हटणार नाही.
आशिया कप २०२५ मध्ये भारताला पाकिस्तान, यूएई आणि ओमानसह गट अ मध्ये स्थान दिले गेले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग स्टेज सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. आशिया कप वेळापत्रकाची घोषणा करण्यात आल्यानंतर बीसीसीआयकडून पाकिस्तानला स्पर्धेतून वगळण्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळांना आता बीसीसीआयच्या भूमिकेनंतर पूर्णविराम मिळाला आहे. एसीसी अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी शनिवारी आशिया कपच्या १७ व्या आवृत्तीच्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. ही स्पर्धा टी२० स्वरूपात खेळवली जाणारा आहे. जी २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या तयारीनुसार असणार आहे. पहिल्यांदाच आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान हे दोंन्ही संघ यूएई आणि ओमानसह गट अ मध्ये असणार आहे. तर ग्रुप बी मध्ये बांगलादेश, हाँगकाँग, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश करण्यात आहे. प्रत्येक ग्रुपमधील टॉप दोन संघ सुपर फोर स्टेजमध्ये प्रवेश करणार असून त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. ज्यामुळे स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होण्याची शक्यता बळावली आहे.