Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Schedule: प्रतीक्षा संपली! आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; पहिल्या सामन्याचा मान कोणाला?

BCCI ने आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्यातील २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल. जाणून घ्या पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचे सामने आणि तारखा

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 11, 2026 | 07:47 PM
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर (photo Credit- X)

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • प्रतीक्षा संपली!
  • आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर
  • पहिल्या सामन्याचा मान कोणाला?
IPL 2026 Schedule Announce: क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जगभरातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग, म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केली आहे. या हंगामाचा सलामीचा सामना शनिवारी, २८ मार्च रोजी रंगणार असून, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) सामना सनरायझर्स हैदराबादशी (SRH) होणार आहे.

बंगळुरूमध्ये रंगणार सलामीचा सामना

बीसीसीआयने जाहीर केलेले हे वेळापत्रक २८ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीसाठी आहे. आयपीएल २०२६ चा पहिला महामुकाबला आरसीबी विरुद्ध एसआरएच यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे. सुरुवातीच्या दिवसात चाहत्यांना दररोज एकच सामना पाहायला मिळेल.

🚨 News 🚨 Presenting the schedule for the first 20 matches of #TATAIPL 2026, to be played from March 28 to April 12, 2026 🗓️ Full schedule will be announced once poll dates are announced for three states set to undergo State Assembly elections. More details ▶️… pic.twitter.com/8Iq492v8TE — IndianPremierLeague (@IPL) March 11, 2026

पहिला ‘डबल हेडर’ ४ एप्रिलला

हंगामातील पहिल्या ‘डबल हेडर’चा थरार ४ एप्रिल रोजी पाहायला मिळेल. या दिवशी दुपारी ३:३० वाजता दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने असतील. त्यानंतर संध्याकाळी ७:३० वाजता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल. पुढील दिवशी ५ एप्रिलला पुन्हा दोन सामने रंगतील. दुपारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि संध्याकाळी बहुप्रतिक्षित आरसीबी विरुद्ध सीएसके (CSK) यांच्यात तुफानी लढत होणार आहे.

निवडणुकांमुळे उर्वरित वेळापत्रकाचा सस्पेन्स कायम

बीसीसीआयने सध्या केवळ १२ एप्रिलपर्यंतचेच वेळापत्रक जाहीर केले आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करेल.

T-20 विश्वविजेत्या खेळाडूंचे महाराष्ट्रात जंगी स्वागत; Suryakumar Yadav, Shivam Dube यांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सत्कार

IPL 2026: पहिल्या टप्प्यातील प्रमुख सामने

१२ एप्रिलपर्यंतच्या या वेळापत्रकात मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील मुंबईतील लढतीचाही समावेश आहे. यावेळचा हंगाम नव्या जोशात आणि नव्या रणनीतीसह सुरू होत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

IPL 2026: पहिल्या टप्प्यातील संपूर्ण वेळापत्रक (First Phase List)

खालील तक्त्यामध्ये सामन्यांची तारीख, वेळ आणि ठिकाण यांची सविस्तर माहिती दिली आहे:

तारीख आणि दिवस मुकाबला (Match) ठिकाण (Venue)
२८ मार्च २०२६ (शनिवार) RCB विरुद्ध SRH बेंगळुरू
२९ मार्च २०२६ (रविवार) MI विरुद्ध KKR मुंबई
३० मार्च २०२६ (सोमवार) RR विरुद्ध CSK गुवाहाटी
३१ मार्च २०२६ (मंगळवार) PBKS विरुद्ध GT मुल्लनपूर
०१ एप्रिल २०२६ (बुधवार) LSG विरुद्ध DC लखनऊ
०२ एप्रिल २०२६ (गुरुवार) KKR विरुद्ध SRH कोलकाता
०३ एप्रिल २०२६ (शुक्रवार) CSK विरुद्ध PBKS चेन्नई
०४ एप्रिल २०२६ (शनिवार) DC विरुद्ध MI दिल्ली
०४ एप्रिल २०२६ (शनिवार) GT विरुद्ध RR अहमदाबाद
०५ एप्रिल २०२६ (रविवार) SRH विरुद्ध LSG हैदराबाद
०५ एप्रिल २०२६ (रविवार) RCB विरुद्ध CSK बेंगळुरू
०६ एप्रिल २०२६ (सोमवार) KKR विरुद्ध PBKS कोलकाता
०७ एप्रिल २०२६ (मंगळवार) RR विरुद्ध MI गुवाहाटी
०८ एप्रिल २०२६ (बुधवार) DC विरुद्ध GT दिल्ली
०९ एप्रिल २०२६ (गुरुवार) KKR विरुद्ध LSG कोलकाता
१० एप्रिल २०२६ (शुक्रवार) RR विरुद्ध RCB गुवाहाटी
११ एप्रिल २०२६ (शनिवार) PBKS विरुद्ध SRH मुल्लनपूर
११ एप्रिल २०२६ (शनिवार) CSK विरुद्ध DC चेन्नई
१२ एप्रिल २०२६ (रविवार) LSG विरुद्ध GT लखनऊ
१२ एप्रिल २०२६ (रविवार) MI विरुद्ध RCB मुंबई

Virat Kohliची ‘ती’ रील चर्चेत, काही सेकंदात डिलीट आणि पुन्हा अपलोड; नेमकं घडलं तरी काय?

Web Title: Ipl 2026 first phase match schedule announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • bcci
  • cricket news
  • IPL 2026

संबंधित बातम्या

3 विकेट्स, 25 चेंडूत 50 धावा; लखनऊ सुपर जाएंट्सने पूर्ण सीझन बसवलं, Arjun Tendulkar चे सडेतोड उत्तर
1

3 विकेट्स, 25 चेंडूत 50 धावा; लखनऊ सुपर जाएंट्सने पूर्ण सीझन बसवलं, Arjun Tendulkar चे सडेतोड उत्तर

Shreyas Iyer: ‘कोणासारखं होण्यासाठी मी…’; T20 संघाचा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचे मोठे विधान
2

Shreyas Iyer: ‘कोणासारखं होण्यासाठी मी…’; T20 संघाचा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचे मोठे विधान

असला कसला न्याय? दोन वेळा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या पाटीदारला BCCI ने दिला डच्चू; Rajat ने केले असे काही…
3

असला कसला न्याय? दोन वेळा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या पाटीदारला BCCI ने दिला डच्चू; Rajat ने केले असे काही…

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
4

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.