Asia Cup 2025: India wins TOSS; decides to bowl first; How will UAE bat?
IND vs UAE : आशिया कप २०२५ स्पर्धेला काल म्हणजेच मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी सुरुवात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झालेल्या सामन्याने झाली. या सामन्यात अफगणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी पराभव केला. आज १० सप्टेंबर रोजी स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई खेळवला जात आहे. सामान्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यूएई संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या आशिया कपमधील मोहिमेला विजयी सुरवात करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर यूएई संघ देखील बलाढ्य भारतीय संघाला जोरदार प्रत्युउत्तर देण्यासाठी प्रयत्न करण्यास सज्ज झाला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि यूएई यांच्यात खेळवण्यात आळलेय तिरंगी मालिकेत यूएई संघाने जोरदार लढत दिली होती. त्यामुळे भारतीय संघ या संघाला हळक्यात घेण्याची चूक करणार नाही. त्यामुळे हा आजचा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : IND आणि UAE येणार सामने! आज कोणाची असेल चलती? फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या Pitch report
दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर गोलंदाजांनी आपला दबदबा दाखवला आहे, त्यांनी नेहमीच फलंदाजांवर अंकुश ठेवल्याचे इतिहासावरुन सांगता येते. या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी ६४ टक्के विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, उर्वरित विकेट्स फिरकी गोलंदाजांनी चटकावल्या आहेत. मधल्या काही षटकांमध्ये, फिरकी गोलंदाज प्रभावी ठरल्याचे आकडेवारी स्पष्ट करते. जर सरासरी धावसंख्येबद्दल सांगायचे झाले तर ती १४४ धावा इतकी राहिली आहे. त्याच वेळी, येथे प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकण्याची ५९ टक्के हमी आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा आणि रिंकू सिंग.
मुहम्मद वसीम (कर्णधार), मुहम्मद जोहैब, आसिफ खान, आलिशान शराफू, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), हर्षित कौशिक, हैदर अली, मुहम्मद फारूख, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग, एथन डिसोझा, ध्रुव पराशर, मुहम्मद जवादुल्ला, आर्यनश शर्मा, सागिरुल्ला खान (विकेटकीपर), सागिर खान (विकेटकीपर).