Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS NZ 2nd T20 : पत्नीच्या सल्ल्याने पालटला दिवस! 23 डावांनंतर फॉर्ममध्ये परतलेल्या कर्णधाराने केला खुलासा; पहा VIDEO

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात अर्धशतक झळकवणाऱ्या सूर्याने त्याच्या पत्नीच्या सल्ल्याबद्दल खुलासा केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 24, 2026 | 03:44 PM
IND vs NZ 2nd T20: The day changed with his wife's advice! 'Surya' shone after 23 innings; the captain, who returned to form, made the revelation.

IND vs NZ 2nd T20: The day changed with his wife's advice! 'Surya' shone after 23 innings; the captain, who returned to form, made the revelation.

Follow Us
Close
Follow Us:

Suryakumar Yadav’s statement about his wife : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला. दुसरा सामना शुक्रवारी  रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या  जोरावर १५.२ ओव्हरमध्येच गाठले. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात सुरकुमार यादवने नाबाद अर्धशतक झळकवले. याबाबत त्याने मोठा खुलासा केला आहे.

न्यूझीलंडने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करत  रचीन रवींद्रच्या ४४ धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर ६ गडी गामावत २०८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात चांगली नव्हती. अभिषेक शर्मा शून्य तर संजू ६ धावा करून बाद झाले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (नाबाद ८२) आणि इशान किशन (७६) यांच्या आक्रमक खेळीने संघाचा डाव सावरला आणि भारताला ७ विकेट्सने विजय मिळवून दिला. भारताने या विजयासह मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात विक्रमी २८ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि न्यूझीलंडचा सात विकेट्सने पराभव केला.

हेही वाचा : DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान

दरम्यान, या सामन्यात अजून एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव याचे फॉर्ममध्ये परत येणे. तब्बल ४६८ दिवसांनंतर, सूर्याने टी२० क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने ८२ धावांच्या खेळीसह संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका देखील बजावली. सूर्यासोबत, इशान किशनने ७६ धावा करत त्याला चांगली साथ दिली. दरम्यान, दुसऱ्या टी२० सामन्यातील विजयानंतर, सूर्यकुमार यादवने इशान किशनशी त्याच्या फॉर्ममध्ये परतण्याबद्दल चर्चा केली. बीसीसीआयकडून त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Fearless intent 💪
Clarity of mind 😇
Flawless execution 👌
Reflecting on a commanding partnership ft. Captain Surya Kumar Yadav & Ishan Kishan 🤝 – By @RajalArora #TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @surya_14kumar | @ishankishan51 https://t.co/UkajUNlFHG — BCCI (@BCCI) January 24, 2026

व्हिडिओमध्ये सूर्याने त्याच्या फॉर्मबद्दल बोलताना म्हटले की, “जेव्हा मी घरी जातो तेव्हा माझ्या घरी एक प्रशिक्षक बसून असतो. ज्यांच्याशी मी लग्न केले आहे. ती मला माझा वेळ घेण्यास सांगत राहते. तिने मला खूप जवळून पाहिले असून ती माझे मन देखील जाणते. म्हणून मी तिच्या सल्ल्याचे पालन केले आणि काळजीपूर्वक खेळलो, माझ्या डावात थोडा वेळ काढण्याचा विचार केला. मी गेल्या सामन्यात आणि या सामन्यात देखील असेच केले.”

हेही वाचा : IND VS NZ 2nd T20l Match : टी२० मध्ये भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला! धावांचा पाठलाग करताना केला ‘हा’ पराक्रम

कर्णधार सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, “मी लोकांना सांगत होतो की मी नेटमध्ये चांगली फलंदाजी करत आहे, परंतु तो आत्मविश्वास तोपर्यंत येत नाही जोपर्यंत तुम्ही सामन्यांमध्ये धावा काढण्यात यशस्वी होत नाही. मला २-३ दिवस चांगली विश्रांती मिळाली, घरी गेलो आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहिलो. गेल्या तीन आठवड्यांत मी चांगला सराव केला, त्यामुळे मी योग्य मानसिकतेत आलो.”

Web Title: Ind vs nz the day changed because of my wifes advice suryakumar yadav who is back in form reveals the secret

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Ishan Kishan
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND VS NZ 2nd T20l Match : टी२० मध्ये भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला! धावांचा पाठलाग करताना केला ‘हा’ पराक्रम 
1

IND VS NZ 2nd T20l Match : टी२० मध्ये भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला! धावांचा पाठलाग करताना केला ‘हा’ पराक्रम 

DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान
2

DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान

IND vs NZ : सूर्यकुमार यादवबाबत केलेला दावा शिवम दुबेचा सिद्ध! म्हणाला – तेव्हा मी म्हटले होते की जगाला…
3

IND vs NZ : सूर्यकुमार यादवबाबत केलेला दावा शिवम दुबेचा सिद्ध! म्हणाला – तेव्हा मी म्हटले होते की जगाला…

हार्दिक पांड्या आणि मुरली कार्तिकमध्ये मैदानावर बाचाबाची? नक्की झालं काय, सोशल मिडियावर Video Viral
4

हार्दिक पांड्या आणि मुरली कार्तिकमध्ये मैदानावर बाचाबाची? नक्की झालं काय, सोशल मिडियावर Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.