
IND VS NZ 2nd T20I Match: India breaks Pakistan's world record in T20s! Achieved 'this' feat while chasing a target.
India broke Pakistan’s world record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. काल, शुक्रवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने २०९ धावांचे लक्ष्य गाठत न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव करून मालिकेत २-० अशी आघाडी घातली. भारताने या विजयासह एक खास इतिहास देखील रचला आहे.
भारताने रायपुरमध्ये न्यूझीलंडने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग गेला. यासह टी२० क्रिकेटमध्ये २००+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू शिल्लक असताना विजय मिळवणारा भारत पहिला पूर्ण सदस्य देश ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने २८ चेंडू शिल्लक ठेवत २०९ धावांचे लक्ष्य सहज गाठले. या यादीमध्ये पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे, त्याने २०२५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २४ चेंडू शिल्लक राखत २०५ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने २०२५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २३ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला आहे. २०० प्लस धावांच्या लक्ष्याचा सर्वात यशस्वी पाठलाग करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सहा वेळा ही किमया साधली आहे. तर ऑस्ट्रेलियाने सात वेळा ही कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका (५), पाकिस्तान (४) आणि इंग्लंड (३) यांचा या यादीत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर लागतो.
हेही वाचा : DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान
भारताने यापूर्वी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले होते. तर, वेस्ट इंडिजविरुद्ध २०१८ मध्ये २०८ धावांचे लक्ष्य गाठताना विजय संपादन केला होता. भारतीय संघाने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २०७ धावा, २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २०४ धावा आणि २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२ धावांचे लक्ष्य गाठण्यात यश मिळवले होते.
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारत विजयी
नाणेफेक गमावणाऱ्या न्यूझीलंडने ६ गडी गमावत २०८ धावा उभ्या केल्या होत्या. संघाकडून कर्णधार मिशेल सँटनरने २७ चेंडूत सर्वाधिक ४७ धावा केल्या, तर रचिन रवींद्रने ४४ धावा केल्या होत्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर हार्दिक पंड्या, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक बळी टिपण्यात यश मिळवले आहे.
हेही वाचा : IND vs NZ : सूर्यकुमार यादवबाबत केलेला दावा शिवम दुबेचा सिद्ध! म्हणाला – तेव्हा मी म्हटले होते की जगाला…
प्रत्युत्तरादाखल, भारताने १५.२ षटकांतच २०९ धावांचे लक्ष्य गाठत विजय मिळवला. भारतीय संघाकडून इशान किशनने ३२ चेंडूत चार षटकार आणि ११ चौकारांसह ७६ धावा फटकावल्या तर संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत नाबाद ८२ धावा करून संघाच्या विज्यावर शिक्कामोर्तब केले.