Sourav Ganguly trolls 'that' statement of India-Pak match 'now you feel ashamed...'
Sourav Ganguly trolled : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सौरव गांगुली सद्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या भारत आणि पाकिस्तान सामान्यांवरूच्या विधानाने लोक त्याला ट्रोल करत आहेत. तो एका विधानाने चांगलाच अडचणीत आला आहे. गांगुलीने आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं. त्याबाबत त्याने एक विधान केलं जे आता त्याच्या चांगलाच अंगलट आलं आहे. त्याने मांडलेलं मत चाहत्यांना अजिबात रुचले नाही. परिणामी त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सौरव गांगुली म्हणाला की, खेळ झाला पाहिजे, तसे तो पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल देखील काही बोलून गेला.
सौरव गांगुली एएनआयशी बोलताना म्हटला की, “मला काही एक समस्या नाही. खेळ सुरु राहिला हवा, पहलगाममध्ये जे झालं, ते व्हायला नको होतं. पण खेळ सुरु राहिला पाहिजे. दहशतवाद कधी कुठे होऊन नये. तो रोखलाच गेला पाहिजे. भारताकडून दहशतवादाविरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत.” सौरव गांगुलीच हे स्टेटमेंट सोशल मीडियावर सद्या वेगाने व्हायरल होत आहे.
पाकिस्तान पुरस्कृत संघटनेकडून 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी हा हल्ला घडवला आहे. भारत आजही पहलगाम हल्ला विसरलेले नाहीत. भारताने 7 ते 10 मे दरम्यान ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलेच उत्तर दिले आहे. भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त करण्यात आली. तर पाकिस्तानकडून लष्करी आणि नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमने हा हल्ला परतवून लावला.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 टूर्नामेंटमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. या सामन्याने भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोशल मीडियावर लोकांनी खेळाडूला चांगलाच ऐकवलं आहे. त्यानंतर लीजेंड्स टीमकडून पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय बदलण्यात आला.
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. 28 सप्टेंबरला फायनल सामना खेळवला जाणार आहे. भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला UAE विरुद्ध खेळणार आहे. तर पाकिस्तानविरुद्धचा सामना १४ सप्टेंबरला होणार आहे.