IND vs SL: Sri Lanka will end the tournament with a sweet note; won the toss and decided to bowl first against India
Asia cup 2025 : आज २६ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मधील सुपर ४ सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका अमानेसमाने येणार आहे. आशिया कप २०२५ मधील हा आजचा शेवटचा सुपर ४ सामना आहे. या सामन्यायाधी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.
हेही वाचा : Gun celebrations : धोनी-कोहली आले धावून! साहिबजादा फरहानवरील ICC ची कारवाई टळली…
आशिया कप स्पर्धेतील हा शेवटचा सुपर ४ सामना असणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी केवळ एक औपचारिकता म्हणून असणार आहे. भारतीय संघ आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करत आहे. भारताने २४ सप्टेंबर रोजी बांगलादेशचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केल आहे तर २५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेचा संघ सुरुवातीचे दोन्ही सामने गमावून अंतिम फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी श्रीलंकेचा संघ हा शेवटचा सुपर ४ सामना जिंकून स्पर्धेतून सन्मानजनक निरोप घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
आज दुबई येथे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर ४ सामना खेळला जाणार आहे. या सामन्यादरम्यान आर्द्रता ५०% च्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने या मैदानावर दोन सुपर ४ सामने खेळले आहेत. भारताने हे दोन्ही सामने सुपर फोर सामने जिंकले आहेत. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी धावसंख्या १७० धावा इतकी आहे, तर दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या १५० धावा इतकी आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘अंतिम सामन्याचा निकाल…’, भारताकडून दोन वेळा पराभूत होऊनही पाकिस्तानी प्रशिक्षकाची अकड कायम
भारतः सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू संजू, हरिखेत, रवींद्रन आणि राजकुमार सिंग.
श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महेश थेक्शाना, नुवानिडू फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, डुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, नुवानिडू फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, ब. आणि मथिशा पाथीराना.