Team India (Photo Credit- X)
Indian Team Squad for Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी (Asia Cup 2025) भारतीय संघाची अधिकृत घोषणा (Team India Squad) करण्यात आली आहे. निवड समितीचे प्रमुख अजित अगरकर (Ajit Agarkar) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची निवड जाहीर केली. या घोषणेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुभमन गिलची (Shubman Gill) संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टी-२० संघात पुनरागमन केले आहे. मात्र, अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संघातून वगळण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरुवात ९ सप्टेंबर २०२५ पासून यूएईमध्ये होणार आहे.
भारतीय संघात यावेळी ७ खेळाडू असे आहेत, ज्यांना पहिल्यांदाच अशिया कपच्या संघात स्थान मिळाले आहे. निवड समितीने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवून त्यांचे नशीब उघडले आहे.
अभिषेक शर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग
गेल्या काही काळापासून टी-२० क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संजू सॅमसनने भारतीय टी-२० संघासाठी ४२ सामन्यांमध्ये तीन शतके आणि दोन अर्धशतकांसह एकूण ८६१ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, अभिषेक शर्माने २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ५३५ धावा केल्या आहेत.
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने २०१२ मध्ये भारतीय टी-२० संघात पदार्पण केले होते. खराब फॉर्ममुळे तो संघातून बाहेर गेला, पण आयपीएलमधील दमदार प्रदर्शनामुळे त्याने पुन्हा संघात स्थान मिळवले आहे. त्याने १८ टी-२० सामन्यांत ३३ बळी मिळवले आहेत. तसेच, जितेश शर्माला राखीव यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. फिनिशर म्हणून ओळख असलेल्या रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंग आपल्या वादळी फलंदाजीने काही चेंडूंमध्येच सामन्याचे चित्र बदलू शकतो.
आशिया कप २०२५ साठी संघात शुभमन गिलच्या समावेशाबद्दल बोलताना, कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, तो शेवटचा टीम इंडियासाठी टी-२० खेळला जो टी-२० विश्वचषक नंतर, जेव्हा आम्ही श्रीलंकेला गेलो होतो. त्यावेळी मी कर्णधार होतो आणि गिल उपकर्णधार होता.
सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, येथून आम्ही टी-२० विश्वचषकासाठी एक नवीन टप्प्याची सुरवात केली आहे. तो सर्व कसोटी मालिकांमध्ये व्यस्त झाला आणि कसोटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त असल्याने त्याला टी-२० खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तो म्हणाला की म्हणूनच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आनंदित आहोत.