Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर

Asia Cup rising Stars 2026 Points Table India tops: आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव केला. याचा फायदा भारताला गुणतालिकेतही झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 21, 2026 | 02:09 PM
Asia Cup rising Stars 2026 Points Table

Asia Cup rising Stars 2026 Points Table

Follow Us
Follow Us:
  • नेपाळचा धुव्वा उडवत भारत अव्वलस्थानी
  • पाकिस्तानला मोठा धक्का
  • आता २२ नोव्हेंबरला भिडणार
Asia Cup Rising Stars 2026: आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेला १९ नोव्हेंबर रोजी दोहा येथे सुरुवात झाली. भारत ‘अ’ संघाने दमदार सुरुवात केली आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव केला. भारतीय संघाने नेपाळवर ३०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

भारताने प्रथम फलंदाजी करत नेपाळला ३३३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात, नेपाळ संघ अवघ्या २६ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात तिलकने वर्माने शानदार शतक झळकावले. या महत्त्वपूर्ण विजयाचा भारतीय संघाला गुणतालिकेतही फायदा झाला. तसेच, पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर ढकलला घसरला.

IND vs PAK सामन्यात पुन्हा वाद! एकही चेंडू न खेळता पाकिस्तान बनला विजेता; भारताचा अवॉर्ड सेरेमनीवर बहिष्कार, नेमकं प्रकरण काय?

पॉईंट्स टेबलमध्ये भारत अव्वल स्थानी

भारत ‘अ’ संघाने नेपाळला ३०६ धावांनी पराभूत करून दोन गुण मिळवले. ‘ब’ गटामध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि नेपाळ यांचा समावेश आहे. ‘ब’ गटाच्या गुणतालिकेत भारताने अव्वल स्थान पटकावले. भारताचा नेट रन रेट ६.१२० आहे. दुसरीकडे, पाकिस्तान दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु त्यांचा नेट रन रेट १.२२० आहे. या गटात संयुक्त अरब अमिराती (UAE) तिसऱ्या तर, नेपाळ चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंत, भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही आपला पहिला सामना जिंकून दोन गुण मिळवले आहेत. नेपाळला ३०६ धावांनी पराभूत करून भारताने आपला रनरेट लक्षणीयरित्या वाढला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २२ नोव्हेंबर रोजी एक ऐतिहासिक सामना होणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर, पुन्हा एकदा गुणतालिकेत उलटफेर पाहायला मिळू शकतो.

भारताचा नेपाळवर दणदणीत विजय

भारताने प्रथम फलंदाजी केली. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि आयुष बडोनी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी सूत्रे हाती घेतली आणि शानदार शतके झळकावली. कुशाग्रने १०२ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ५ षटकारांसह ११७ धावांची शानदार खेळी केली.

तिलकने ११३ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ४ षटकारांसह १०७ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २०६ धावांची भागीदारी केली. भारताने अखेरीस ५० षटकांत ९ विकेट्स गमावून ३३२ धावांचा डोंगर उभा केला. ३३३ धावांचे लक्ष्य गाठताना नेपाळचा संघ अवघ्या २६ धावांत सर्वबाद झाला. एकही खेळाडू खेळपट्टीवर टिकू शकला नाही. भारतासाठी प्रिन्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेतले, तर हर्षितने ४ विकेट्स घेतले. शहबाज अहमदनेही एक विकेट घेतला.

SA vs BAN: बांग्लादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने जाहीर केले ODI -T20 संघ! केशव महाराज कर्णधारपदी; ३ वर्षांनंतर स्टार गोलंदाजाचे कमबॅक

Web Title: Asia cup rising stars 2026 india tops points table beats nepal pakistanpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Asia Cup Rising Stars 2026
  • IND VS PAK
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

India A vs Pakistan A: पुन्हा हायव्होल्टेड ड्रामा Sunday! ‘आमच्यासाठी हा फक्त सामना…’, कर्णधार तिलक वर्माचं स्पष्ट मत
1

India A vs Pakistan A: पुन्हा हायव्होल्टेड ड्रामा Sunday! ‘आमच्यासाठी हा फक्त सामना…’, कर्णधार तिलक वर्माचं स्पष्ट मत

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड
2

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव
3

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव

IND vs PAK सामन्यात पुन्हा वाद! एकही चेंडू न खेळता पाकिस्तान बनला विजेता; भारताचा अवॉर्ड सेरेमनीवर बहिष्कार, नेमकं प्रकरण काय?
4

IND vs PAK सामन्यात पुन्हा वाद! एकही चेंडू न खेळता पाकिस्तान बनला विजेता; भारताचा अवॉर्ड सेरेमनीवर बहिष्कार, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.