Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK सामन्यात पुन्हा वाद! एकही चेंडू न खेळता पाकिस्तान बनला विजेता; भारताचा अवॉर्ड सेरेमनीवर बहिष्कार, नेमकं प्रकरण काय?

IND vs PAK India blind cricket team boycotts ceremony Pak awarded Asia Cup final : पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया कप २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर पाकिस्तानला एकमेव विजेता घोषित करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 20, 2026 | 09:20 PM
IND vs PAK India blind cricket team

IND vs PAK India blind cricket team

Follow Us
Follow Us:
  • मैदानात सामना नाही पाकिस्तानला मिळाली ट्रॉफी
  • भारताने सोहळाच नाकारला
  • IND vs PAK वादाचे कारण काय?
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यावेळी, ब्लाइंड क्रिकेट आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यातील निर्णयावरुन खळबळ उडाली आहे. ब्लाइंड क्रिकेट आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान भिडणार होते.

परंतु, पावसामुळे सामना सुरु होऊ शकला नाही. यानंतर , सामना रद्द करण्यात आला.असे असूनही, पाकिस्तानला एकमेव विजेता घोषित करण्यात आले. यानंतर, भारतीय संघ आणि भारतातील ब्लाइंड क्रिकेट संघटनेने (CABI) या निर्णयाचा तीव्र निषेध केला.निषेध म्हणून, भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी वितरण समारंभावर बहिष्कार टाकला आणि पाकिस्तानला एकमेव विजेता घोषित करण्याचा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला.

IND vs PAK: पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम! भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार; कधी अन् कुठे पाहाल महामुकाबला ?

पावसामुळे भारत-पाकिस्तान अंतिम सामना रद्द

पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया कप २०२६ चा अंतिम सामना शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी, बांग्लादेशची राजधानी ढाका येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार होता. परंतु, सततच्या पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकही झाली नाही आणि अखेरीस सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर सामनाधिकाऱ्याने पाकिस्तानचा चांगला नेट रन रेट असल्याचे कारण देत त्यांना स्पर्धेचा विजेता घोषित केले. या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आणि भारतीय संघाने तीव्र निषेध नोंदवला. भारतीय संघाचा युक्तिवाद होता की, पावसामुळे अंतिम सामना खेळला जाऊ शकला नाही, त्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करायला हवे होते. निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी वितरण समारंभात भाग घेतला नाही.

The trophy was awarded to Pakistan without the final being played. WBCC President and Pakistan Blind Cricket Council President Sultan Shah overruled the WBCC Technical Committee’s decision to declare joint winners, forcing the match referee to announce the same decision. pic.twitter.com/XHoRsSo48D — Cricket Association for the Blind in India (CABI) (@blind_cricket) November 20, 2026

हा निर्णय नियमांच्या विरोधात – कॅबी

भारतीय ब्लाइंड क्रिकेट संघटनेने (CABI) देखील पाकिस्तानला एकमेव विजेता घोषित करण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे.  आपल्या अधिकृत निवेदनात, CABI ने म्हटले आहे की, पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यानंतर पाकिस्तानला पुरुष ब्लाइंड क्रिकेट आशिया कप २०२६ चा एकमेव विजेता घोषित करणे चुकीचे आहे. संघटना हा निर्णय स्वीकारत नाही आणि दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपदाचा दर्जा दिला पाहिजे.

संयुक्त विजेते घोषित करण्यासाठी CABI ने दिला नियमांचा हवाला

CABI ने आपल्या निषेधाच्या समर्थनार्थ स्पर्धेच्या तांत्रिक नियमावलीतील कलम २७ चाही हवाला दिला. संस्थेनुसार, या कलमात अंतिम सामन्यात सामना बरोबरीत सुटल्यास काय करायचे याच्या तरतुदी आहेत आणि दोन्ही कलमांमध्ये या परिस्थितीचा स्पष्टपणे उल्लेख आहे. CABI ने जागतिक ब्लाइंड क्रिकेट परिषदेच्या (WBCC) तांत्रिक समितीसमोर नियमावली मांडली. संस्थेच्या निवेदनानुसार, समितीने सुरुवातीला भारत आणि पाकिस्तानला संयुक्त विजेते घोषित करण्यास सहमती दर्शवली.

तरीही, असे असूनही, अंतिम निर्णय पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि त्यांना एकमेव विजेते घोषित करण्यात आले. आता CABI ने हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. स्पर्धेच्या तांत्रिक नियमांनुसार भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही संयुक्त विजेते घोषित केले पाहिजे, असा या संस्थेचा युक्तिवाद आहे.

SA vs BAN: बांग्लादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने जाहीर केले ODI -T20 संघ! केशव महाराज कर्णधारपदी; ३ वर्षांनंतर स्टार गोलंदाजाचे कमबॅक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्लाइंड क्रिकेट आशिया कप २०२६ चा अंतिम सामना कोणामध्ये होणार होता?

    Ans: भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार होता.

  • Que: भारत-पाकिस्तान अंतिम सामना रद्द का झाला?

    Ans: ढाका येथे सतत पाऊस झाल्यामुळे सामना रद्द करण्यात आला.

  • Que: पाकिस्तानला विजेता का घोषित करण्यात आले?

    Ans: पाकिस्तानचा नेट रनरेट चांगला असल्याचे कारण देत त्यांना विजेता घोषित करण्यात आले.

Web Title: Ind vs pak blind cricket asia cup final 2026 trophy controversy india boycott award ceremony pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Asia Cup
  • blind people
  • cricket news
  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • Pakistan Cricket team

संबंधित बातम्या

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव
1

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव

IND Vs NEP : भारताचे नेपाळला 333 धावांचे आव्हान, तिलक-कुशाग्रचे दणदणीत शतक
2

IND Vs NEP : भारताचे नेपाळला 333 धावांचे आव्हान, तिलक-कुशाग्रचे दणदणीत शतक

IND vs PAK: पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम! भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार; कधी अन् कुठे पाहाल महामुकाबला ?
3

IND vs PAK: पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम! भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार; कधी अन् कुठे पाहाल महामुकाबला ?

PAK Vs SL: पाकिस्तानने संपवला दुष्काळ! श्रीलंकेला उद्ध्वस्त करत  तब्बल 2 वर्षांनी जिंकली टेस्ट सिरीज
4

PAK Vs SL: पाकिस्तानने संपवला दुष्काळ! श्रीलंकेला उद्ध्वस्त करत तब्बल 2 वर्षांनी जिंकली टेस्ट सिरीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.