Indian hockey teams revert to blue jerseys
IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?
आशियाई खेळांसंदर्भातील परिस्थिती स्पष्ट करताना, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की तिर्की यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने संघाच्या किटच्या रंगांची पसंती मागितली होती आणि हॉकी इंडियाने निळा रंग पहिली पसंती म्हणून निवडला होता, तर भगवा रंग दुसरी पसंती होती. तिर्की म्हणाले की, त्यांनी विश्वचषकापूर्वीच स्पष्ट केले होते की जर्सीचा भगवा रंग कायमस्वरूपी नाही आणि भविष्यात तो बदलला जाऊ शकतो. त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय संघ आशियाई खेळांमध्ये निळ्या जर्सीमध्ये खेळेल.
नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये नुकत्याच झालेल्या विश्वचषकाच्या अगदी आधी, भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग पारंपरिक निळ्यावरून भगवा केल्याने वाद निर्माण झाला. त्यावेळी, तिर्की यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि दावा केला की हा निर्णय त्यांच्या किंवा कार्यकारी मंडळाच्या माहितीशिवाय घेण्यात आला होता. तेव्हा हा वाद आणखी वाढला. जर्सी बदलण्यामागील कारण असे होते की निळ्या टर्फवर निळ्या जर्सीमध्ये खेळणे आव्हानात्मक असेल. त्यावेळी, जर्सीचा रंग बदलण्याच्या निर्णयावर अनेक माजी भारतीय हॉकी दिग्गजांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. माजी कर्णधार विरॉन रासकिन्हा, परगत सिंग, धनराज पिल्लई आणि अजित पाल सिंग यांनी भगव्या जर्सीवर आपला आक्षेप व्यक्त केला होता. नंतर या मुद्द्याचे राजकीय वादात रूपांतर झाले.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची कामगिरी निराशाजनक ठरली आणि त्यांना आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, महिला संघाने पाचवे स्थान पटकावले, जी १९७४ नंतरची त्यांची सर्वोत्तम विश्वचषक कामगिरी आहे. आता भारतीय संघांचे लक्ष आशियाई खेळांवर आहे. ही स्पर्धा र २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची एक महत्त्वपूर्ण संधी देखील देणार आहे. त्यामुळे, आशियाई खेळांमधील कामगिरी भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असेल.






