
Asian Games : पुरुष बॅडमिंटन संघाने क्वार्टर फायन गाठले; तुल्यबळ बांगलादेशला 3-0 ने नमवले
भारताला सुरुवातीलाच लक्ष्य सेनने चांगली सुरुवात करून दिली. बांगलादेशचा खेळाडू अयमान इब्न झमानविरुद्ध खेळताने लक्ष्यने चांगला खेळ दाखवला. पहिल्या सेटमध्ये लक्ष्यने पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. एकापाठोपाठ एक दमदार शॉट्स खेळताना त्याने हा सेट 21-4 अशा मोठ्या फरकाने आपल्या खिशात घातला. लक्ष्यने आपली हिच लय कायम राखताना दुसऱ्या सेट 21-12 असा आपल्या नावे करत सामन्यात भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. लक्ष्यच्या जबरदस्त स्मॅशसमोर झमानला टिकाव धरता आला नाही.
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये शानदार कामगिरी करत चर्चेत आलेल्या आयुष शेट्टीने दुसऱ्या सामन्यात कमालची कामगिरी केली. बांगलादेशच्या गौरव सिंघावर आयुष हा पूर्णतः वरचढ ठरला. त्याने सिंघाला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. आयुषने पहिला सेट 21-4, तर दुसरा सेट 21-13 असा प्राप्त करत भारताची आघाडी 2-0 ने पुढे नेली.
Hockey India : हॉकी इंडियाकडून सविता पूनियाला 10 लाखांचे बक्षिस, ‘हे’ आहे कारण….
तिसऱ्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतची कामगिरी सर्वोत्तम राहिली. त्याने बांगलादेशचा खेळाडू जुमार अल-अमीनचा पराभव करत भारताचा विजय साजरा केला. दरम्यान, श्रीकांत पहिल्या सेटमध्ये थोडा वेळ भरकटला होता, पण नंतर त्याने स्वतःला सावरत हा सेट 21-15 असा आपल्या नावे केला.
दुसऱ्या सेटमध्ये त्याने जुमारला पुनरागमन करू दिले नाही व हा सेट 21-10 असा जिंकत बांगलादेशच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारतीय पुरुष संघाने क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात भारताचा सामना मंगळवारी जपानविरुद्ध होणार आहे. भारतीय पुरुष जर येथे विजय मिळवतात, तर त्यांचे पदक निश्चित होईल.
Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय