Asian Games : क्वार्टर फायनलमध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाला धक्का; 'या' संघाकडून मिळाला पराभव, सौजन्य : आयएएनएस
एशियन गेम्स 2026 (Asian Games) मध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाचा प्रवास क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात आला. मंगळवारी भारतीय संघाला जपानविरुद्ध 1-3 असा पराभवाचा सामना करावा लागला.
त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने शानदार विजय नोंदवला, पण सिंगल्समध्ये भारतीय संघाला आपल्या तीनही सामन्यात पराभव पत्कारावा लागला. सामन्याची सुरुवात भारतासाठी चांगली राहिली नाही. दोन वेळची पदक विजेती पी. व्ही. सिंधु एकतर्फी सामन्यात जगातील क्रमांक 3 ची खेळाडू अकाने यामागुचीविरुद्ध 23-21, 18-21, 6-21 अशी पराभूत झाली.
त्यानंतर उन्नती हुड्डादेखील 2022 ची वर्ल्ड ज्यूनियर चॅम्पियन आणि सध्याची जागतिक क्रमांक 7 ची खेळाडू टोमॉको मियाजाकीचा सामना करू शकली नाही. तिला मियाजाकीकडून 16-21, 18-21 असा पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह जपानने आपली आघाडी 2-0वर नेली.
Asian Games: भारताच्या वाघिणींसमोर श्रीलंका उद्ध्वस्त; 147 रन्सने केला पराभव अन् जिंकले Gold Medal
दरम्यान, सलगच्या दोन पराभवानंतर कोर्टवर उतरलेल्या त्रिशा आणि गायत्री या जोडीने भारतीय संघाला सामन्यात कायम राखले व डबल्सच्या सामन्यात युकी फुकुशिमा आणि मायु मास्तुमोतोचा 21-17, 21-16 असा पराभव करत भारताच्या आशा कायम राखल्या.
दुसरीकडे, निर्णायक सामन्यात तन्वी शर्माला माजी विश्व चॅम्पियन नोजोमी ओकुहाराविरुद्ध 12-21, 10-21 असा पराभव पत्कारावा लागला, ज्यामुळे जपानने या सामन्यात आपला विजय पक्का केला. जपानविरुद्ध मिळालेल्या पराभवासह भारतीय महिला संघाचे एशियन गेम्स 2026 मध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.
एशियन गेम्समधील भारतीय महिला बॅडमिंटन संघाचा इतिहास पाहता त्यांना फक्त एकदाच पदक जिंकता आले. 2014 साली कांस्य पदक संघाने पटकावले होते. मागील स्पर्धेत भारताला थायलंडविरुद्ध 0-3 अशा पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.






