Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून खेळाडू बेपत्ता! क्रीडा विश्वात उडाली खळबळ

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 11, 2022 | 12:59 PM
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून खेळाडू बेपत्ता! क्रीडा विश्वात उडाली खळबळ
Follow Us
Follow Us:

इंग्लंडच्या बर्मिंगहम येथे आयोजित करण्यात आलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2022) ८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वच देशातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून काही जण पदक जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. भारतासाठी देखील ही स्पर्धा खास ठरली असून या स्पर्धेत ६१ पदक भारतीय खेळाडूंनी कमावली. जगभरात या स्पर्धेचा बोलबाला सुरु असतानाच, आता या स्पर्धेतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २२ व्या हंगामातून काही देशातील खेळाडू बेपत्ता झाले असून या बातमीने सध्या क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

८ ऑगस्ट रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोह सोहोळा पार पडला. यात पाकिस्तानचे दोन बॉक्सर सुलेमान बलूच (Suleman Baloch) आणि नजीरुल्लाह खान (Nazeer Ullah Khan) हे दोन खेळाडू स्पर्धेच्या समारोह सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी गेले असताना तेथून ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महासंघानं ही माहिती दिली असून पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे सचिव नासेर तांग यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानच्या पूर्वी श्रीलंकेतील काही खेळाडू देखील या स्पर्धेतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तान ऑलिम्पिक संघानं बेपत्ता झालेल्या दोन बॉक्सरचा तपास करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केलीय. याआधी दोन महिन्यापूर्वी राष्ट्रीय जलतरणपटू फैझान अकबर हंगेरीतील फिनावर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बेपत्ता झाला होता. मात्र जूनपासून त्याचा तपास लागला नाही.

पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे सचिव नासेर तांग म्हणाले…..
“सुलेमान बलूच आणि नजीरुल्लाह खान यांचे पासपोर्ट आणि इतर प्रवासाची कागदपत्रे महासंघाच्या अधिकाऱ्यांकडे आहेत. संघ व्यवस्थापनानं यूकेमधील पाकिस्तान उच्चायुक्तांना आणि लंडनमधील संबंधित अधिकाऱ्यांना सुलेमान आणि नझिरुल्ला बेपत्ता झाल्याची माहिती दिली. बेपत्ता झालेल्या बॉक्सरची कागदपत्रे पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी मानक कार्यप्रणालीनुसार ठेवण्यात आली”, अशी माहिती तांग यांनी दिली.

Web Title: Athletes missing from the commonwealth games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 12:59 PM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • india
  • Navarashtra Live
  • navarashtra news
  • pakistan
  • Shrilanka

संबंधित बातम्या

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर
1

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
2

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
3

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?
4

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.