नवी दिल्ली- ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia-India) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना (Test match) रंगतदार स्थितीत पोहचला आहे. एकीकडे भारतावर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचण्याचे दडपण आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियालाही १९ वर्षांनंतर भारतात मालिका जिंकण्याची इच्छा आहे. भारताने काल २६२ धावांवर सर्व बाद झाल्यानंतर कांगारूनी काल एक गडी गमावत डावाची सुरुवात केली होती. दरम्यान, आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची खूपच खराब सुरुवात झाली आणि अवघ्या दीड तासात कांगारूंचा संघ ऑल आऊट झाला. या एकाच सामन्यात भारताचा दमदार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि फिरकीपटू आश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
जडेजाने सात विकेटस…
सामन्यात भारताच्या दुसऱ्या देशांसाठी घातक असणाऱ्या जडेजा-अश्विन जोडीने कांगारूंना अक्षरशः घाम फोडला. त्यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज कत्थक करताना दिसले. दुसऱ्या डावात ११३ धावांवर ऑस्ट्रेलिया डाव आटोपला आणि विजयासाठी ११५ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. अश्विनने या डावात ३ विकेट्स तर जडेजाने एकट्याने तब्बल ७ विकेट्स घेतले. अश्विनने दुसऱ्या दिवशी भारताकडून विकेट्स घ्यायला सुरुवात केली. कांगारूनी विजयासाठी ११५ धावांचे माफक आव्हान दिले आहे.
भारताची खराब सुरुवात…
पहिला सामना भारताने एक डाव आणि मोठ्या फरकाने जिंकला होता. तर ११५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. के एल राहुल १ धावावर बाद झाला. तर रोहित शर्मा ३१ धवांवर बाद झाला. काल यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेपर्यंत १ बाद ६१ धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. त्यांच्याकडे ६२ धावांची आघाडी होती. ट्रॅव्हिस हेड (४० चेंडूंत ३९) आणि मार्नस लाबुशेन (१९ चेंडूंत १६) यांनी तिसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. कालच्या धावसंख्येत अवघ्या ४ धावांची भर घालत ऑस्ट्रेलियाची विकेट्स पडायला सुरुवात झाली.