Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ स्टार गोलंदाजावर कारवाई; दोन सामन्यांची घातली बंदी

Australian Megan schutt ban for 2 matches Regarding Prescription: ऑस्ट्रेलियाची स्टार गोलंदाज मेगन शटबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिच्यावर मोठी कारवाई केली असून, तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 22, 2026 | 01:46 PM
Megan schutt ban for 2 matches

Megan schutt ban for 2 matches

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
  • मेगन शटवर दोन सामन्यांच्या निलंबनाची कारवाई
  • नेमकं प्रकरण काय?

Megan Schutt Ban for 2 matches: ऑस्ट्रेलियाची अनुभवी वेगवान गोलंदाज मेगन शटवर कारवाई करण्यात आलेली आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मेगनवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे. मंडळाने स्पष्ट केले की, ही घटना स्पर्धेबाहेर घडली असून तिचा कामगिरी सुधारणाऱ्या औषधांशी संबंध नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्यानुसार, मेगन शटवर लादलेली बंदी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट या दोन्हीसाठी समान लागू होईल. यामुळे, ती गुरुवारी नॉर्थ सिडनी ओव्हलवर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याला मुकणार आहे. तसेच, ती ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महिला बिग बॅश लीगच्या पहिला सामना देखील खेळू शकणार नाही. ( Megan schutt ban for 2 matches Regarding Prescription)

‘मिया मॅजिक’ चा कॅप्टन्सी स्वॅग! Mohammed Siraj च्या नेतृत्वात हैदराबादचा कहर; सलग दुसरा दणदणीत विजय

 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?

ऑस्ट्रेलियाची महिला वेगवान गोलंदाज मेगन शट हिच्यावर केलेल्या कारवाईबाबत, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, हे उल्लंघन स्पोर्ट्स सायंस आणि स्पोर्ट्स मेडिसन मार्गदर्शक तत्त्वांनुसार डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शन औषधांसंदर्भात आहे. मेगनने औषधांच्या वापरासंबंधीच्या आवश्यकतांचे पालन केले नाही. ही घटना ऑस्ट्रेलियन संघाच्या बांगलादेश दौऱ्यापूर्वी घडली. ती स्पर्धेबाहेर असताना तिच्याकडून झालेले हे नियमांचे एकमेव उल्लंघन होते.मंडळाने म्हटले आहे की, ते खेळाडूला आवश्यक ते सहकार्य देत राहतील. तसेच, राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूंसाठी निर्धारित केलेल्या मानकांचे आणि जबाबदाऱ्यांचे पालन करण्याच्या महत्त्वाविषयी त्यांना शिक्षित करत राहतील.

मेगन शटने शिक्षा स्वीकारली

ऑस्ट्रेलियाची महिला वेगवान गोलंदाज मेगन शटने तिच्यावरील कारवाई स्वीकारली आहे. नियमांचे पालन न केल्याबद्दल तिने माफी मागितली. सार्वजनिक रोषाबद्दल तिने खेद व्यक्त केला आणि तिला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. शटने सांगितले की, स्पोर्ट्स सायंस आणि स्पोर्ट्स मेडिसनच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची तिची जबाबदारी होती आणि तिने या नियमांचे पालन करायला हवे होते.

दोन महत्त्वाचे सामने चुकणार

३३ वर्षीय मेगन शूट २२ ऑक्टोबर रोजी सिडनीतील नॉर्थ सिडनी ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्ध होणारा तिसरा आणि अंतिम टी२० सामना खेळू शकणार नाही. तसेच, ती ३१ ऑक्टोबर रोजी ॲडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात होणारा डब्ल्यूबीबीएल २०२६ चा सलामीचा सामनाही खेळू शकणार नाही. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने आधीच २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे, अंतिम सामना जिंकून न्यूझीलंडवर क्लीन स्वीप पूर्ण करण्याचा संघाचा प्रयत्न असेल.

मेगन शटची कारकिर्दी

३३ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिला वेगवान गोलंदाज मेगन शटने ४ महिला कसोटी सामन्यांमध्ये एकूण ९ विकेट्स घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमधील तिची सर्वोत्तम कामगिरी २६ धावांत ४ विकेट्स अशी आहे. त्याचबरोबर, तिने ११४ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण १५८ विकेट्स घेतले आहेत. महिला एकदिवसीय क्रिकेटमधील तिची सर्वोत्तम कामगिरी १९ धावांत ५ विकेट्स अशी आहे. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये मेगन शटने १२६ सामन्यांमध्ये एकूण १५२ विकेट्स घेतले आहेत. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी १५ धावांत ५ विकेट्स अशी आहे.

Hardik Pandya: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! हार्दिक पांड्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह; थेट IPL 2027 मध्येच खेळणार?

Web Title: Australian bowler megan schutt ban for 2 matches regarding medicine prescription pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Australia Team

संबंधित बातम्या

Mitchell Starc: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्टार्कचा महापराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला डावखुरा गोलंदाज
1

Mitchell Starc: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्टार्कचा महापराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला डावखुरा गोलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.