Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मधील ‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?, Axar Patel भडकला

स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने या नियमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने थेट या मुद्द्यावर वक्तव्य करत अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असल्याचे विधान केलं आहे. नेमकं काय प्रकरण ?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 23, 2026 | 06:07 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल भडकला
  • जुन्या वादाने तोंड वर काढले
  • दिग्गजांचाही नियमाला विरोध
Impact Player Rule IPL 2026 : IPL हंगामात नेहमची वेगवेगळे वाद चर्चेत राहिलेले असतात. आताचा २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी क्रिकेट जगतात पुन्हा एकदा एका जुन्या वादाने आपलं तोंड वर काढले आहे. तो वाद म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने या नियमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने थेट या मुद्द्यावर वक्तव्य करत अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असल्याचे विधान केलं आहे. नेमकं काय प्रकरण ?

खेळणार की नाही खेळणार! ODI World Cup मध्ये ‘हे’ संघ बाद होणार? चाहत्यांसाठी दु:खद बातमी

काय म्हणाला अक्षर पटेल?

एका मुलाखतीदरम्यान अक्षर पटेलला या नियमाबद्दल विचारण्यात आलं असता त्याने स्पष्ट केलं की, “खरं सांगायचं तर, मला हा नियम अजिबात आवडलेला नाही. मी एक All-rounder खेळाडू आहे. पूर्वी संघ फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मदत करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची निवड करायचे. पण आता या नियमामुळे संघ व्यवस्थापन फक्त तज्ज्ञ फलंदाज किंवा तज्ज्ञ गोलंदाजाची निवड करते. अष्टपैलू खेळाडूची गरजच काय? असा विचार आता केला जातोय.” अक्षरने पुढे स्पष्ट केले की, जरी वैयक्तिक स्तरावर त्याला हा नियम आवडत नसला तरी, BCCI चे नियम पाळणे खेळाडू म्हणून त्यांचे कर्तव्य आहे.

दिग्गजांचाही नियमाला विरोध

केवळ अक्षर पटेलच नाही, तर भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही यापूर्वी या नियमावर सडकून टीका केली आहे. रोहितच्या मते, या नियमामुळे शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर सारख्या अष्टपैलू खेळाडूंना गोलंदाजीची संधी मिळत नाहीये, जे भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी चांगले नाही.विराटने म्हटले होते की, या नियमामुळे खेळाचा समतोल बिघडला आहे. फलंदाज आता निडर होऊन खेळतात कारण त्यांच्याकडे ८ व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी उपलब्ध असते, ज्यामुळे गोलंदाजांवरील दडपण वाढले आहे.

इतिहास काय सांगतो?

२००५-०६ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाच ‘सुपर-सब’ नियम आणला होता, पण तो अयशस्वी ठरल्याने एका वर्षातच हटवण्यात आला. बिग बॅश लीगमध्ये हा नियम वापरण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाच्या या लीगमध्ये ‘एक्स-फॅक्टर’ नियम आणला होता, तो देखील यशस्वी झाला नाही. जगभरातून विरोध होत असूनही, आयपीएलमध्ये सलग चौथ्या हंगामात हा नियम कायम राहणार आहे.

नेमका काय आहे इम्पॅक्ट प्लेयर नियम?

२०२३ मध्ये बीसीसीआयने हा नियम आणला. यानुसार, सामन्याच्या कोणत्याही परिस्थितीत संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमधील एका खेळाडूला बाहेर काढून त्याच्या जागी राखीव खेळाडूला मैदानात उतरवू शकतो. यामुळे संघांकडे आता ‘११’ ऐवजी ‘१२’ खेळाडूंचे बळ असते.

IPL 2026 : मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कधी परतणार? प्रशिक्षकाकडून दुखापतग्रस्त खेळाडूबाबत माहिती

Web Title: Axar patel statement delhi capitals captain do not like impact player rule ipl 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Axar Patel
  • Delhi Capitals
  • IPL
  • IPL 2026

संबंधित बातम्या

IPL 2026 : मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कधी परतणार? प्रशिक्षकाकडून दुखापतग्रस्त खेळाडूबाबत माहिती
1

IPL 2026 : मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कधी परतणार? प्रशिक्षकाकडून दुखापतग्रस्त खेळाडूबाबत माहिती

IPL संघाच्या स्पॉन्सरशिपने कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला! कोणते संघ आघाडीवर आहेत? वाचा सविस्तर
2

IPL संघाच्या स्पॉन्सरशिपने कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला! कोणते संघ आघाडीवर आहेत? वाचा सविस्तर

MS Dhoni वयाच्या 60 वर्षांपर्यंत आयपीएलमध्ये सीएसकेच्या जर्सीमध्ये दिसणार का? निवृत्तीबद्दलचे नवीन विधान व्हायरल
3

MS Dhoni वयाच्या 60 वर्षांपर्यंत आयपीएलमध्ये सीएसकेच्या जर्सीमध्ये दिसणार का? निवृत्तीबद्दलचे नवीन विधान व्हायरल

PSL चे नाव ‘पेट्रोल टंचाई लीग’, सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर जोरदार टीका; स्पर्धेत मोठे बदल
4

PSL चे नाव ‘पेट्रोल टंचाई लीग’, सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर जोरदार टीका; स्पर्धेत मोठे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.