Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! CSK साठी वाईट बातमी, आयुष म्हात्रेच्या Injury बाबत मोठी अपडेट

चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. CSK चे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीने दुखापतीबद्दल माहिती दिली.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 19, 2026 | 04:23 PM
आयुष म्हात्रेची दुखापत किती गंभीर (फोटो सौजन्य - X.com)

आयुष म्हात्रेची दुखापत किती गंभीर (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • आयुष म्हात्रेच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट 
  • कोच मायकल हसीने दिली माहिती 
  • सीएसकेसाठी वाईट बातमी 
IPL 2026 दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी युवा आघाडीचा फलंदाज आयुष म्हात्रेच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) फलंदाजी करताना त्याला हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. म्हात्रेच्या दुखापतीची तीव्रता अज्ञात आहे, पण ही त्याच्यासाठी नक्कीच एक वाईट गोष्ट आहे.

आयुष म्हात्रेला लागले असतानाही तो मैदानावर खेळला आणि याबाबत आर. अश्विनने तीव्र नाराजीदेखील व्यक्त केली आहे. कारण ही दुखापत गंभीरदेखील ठरू शकते. दुखापत झाल्यानंतर आयुष म्हात्रेला परत बोलवणे गरजेचे होते असं स्पष्ट मत त्याने मांडले आहे. याशिवाय चाहत्यांनाही आयुषने गंभीर दुखापतीनंतर खेळणे पटले नाही. नेटकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. 

CSK Vs SRH Live: चेन्नईचं ‘सुपर’ अपयश! Praful Hinge ने सामना फिरवला; हैदराबादमध्ये ‘किंग्ज’ ढेपाळले

मायकल हसीने आपल्या निवेदनात काय सांगितले?

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत हसी म्हणाले, “हॅमस्ट्रिंग फाटली आहे. दुखापत किती गंभीर आहे हे मला माहीत नाही. आम्ही कदाचित दुसऱ्या दिवशी स्कॅन करू. मला खात्री नाही, पण हो, दुखापत खूप गंभीर दिसत आहे. दुर्दैवाने, त्याची अनुपस्थिती आमच्यासाठी मोठे नुकसान असेल कारण तो आमच्यासाठी चांगल्या लयीत होता.”

ते पुढे म्हणाले, “तो एक उदयोन्मुख युवा खेळाडू आहे, पण यामुळे दुसऱ्या कोणाला तरी संधी मिळेल, ही देखील एक रोमांचक गोष्ट आहे. आमच्याकडे काही खूप चांगले खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्यापैकी एकासाठी ही एक रोमांचक गोष्ट असेल.” आयुषला गमावल्यामुळे आम्ही जितके निराश झालो आहोत, ते किती काळ टिकेल हे माहित नाही, पण एका नवीन खेळाडूला संघात संधी मिळणे हे उत्साहवर्धक आहे.

आयुष म्हात्रे जखमी कसा झाला?

SRH विरुद्धच्या सामन्यात, CSK समोर विजयासाठी १९५ धावांचे लक्ष्य होते. संजू सॅमसनची विकेट पडल्यानंतर, CSK च्या डावातील दुसऱ्या षटकात गुर्जपनीत सिंगच्या जागी बदली खेळाडू म्हणून म्हात्रे मैदानात उतरला. १८ वर्षीय म्हात्रे उत्कृष्ट लयीत दिसत होता आणि त्याने १३ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. डावादरम्यान, पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूनंतर, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना म्हात्रेच्या मांडीचा स्नायू दुखावला. त्याने धाव पूर्ण केली, पण वेदनेने तो खाली बसला. फिजिओ तात्काळ धावून आला. मैदान सोडण्याऐवजी, म्हात्रेने फलंदाजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि काही चेंडूंनंतरच तो बाद झाला.

CSK Vs SRH Live: ऋतुराज गायकवाडचा मोठा निर्णय; एसआरएच विरुद्ध टॉस जिंकत…

दुखापतीमुळे खलील आणि एलिस स्पर्धेतून बाहेर

वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि नॅथन एलिस हे आधीच दुखापतीमुळे बाहेर असल्याने, आयुष म्हात्रे हा सीएसकेच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीतील नवीन भर आहे. माजी कर्णधार एम.एस. धोनी देखील पोटरीच्या दुखापतीतून सावरत असून, तो या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी सराव सत्रादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. सीएसके हा सामना १० धावांनी हरली. या हंगामातील सहा सामन्यांमधील संघाचा हा चौथा पराभव होता. सीएसके गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

Web Title: Ayush mhatre played after hamstring injury in csk vs srh match batting coach micheal hussey gives updated about health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • CSK vs SRH
  • IPL 2026

संबंधित बातम्या

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
1

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
2

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
3

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी
4

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.