बांगलादेशने 'करो या मरो' सामन्यात अफगाणिस्तान दिले १५५ धावांचे आव्हान (Photo Credit- X)
AFG vs BAN, Asia Cup 2025: आज आशिया कप २०२५ चा नववा सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश (AFG vs BAN) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या ‘करो या मरो’ सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशने अफगाणिस्तानसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठवले आहे. सुपर-४ च्या शर्यतीत हा सामना खूप महत्त्वाचा आहे.
1️⃣5️⃣4️⃣ on the board for 🇧🇩
🇦🇫 pulled things back and negated a good start by the batters, keeping the opposition to a middling total.
Will the Tigers replicate this bowling effort & eke out a win?#BANvAFG #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/FwSUoUwmUR— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 16, 2025
नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १५४ धावा केल्या. बांगलादेशकडून सलामीवीर तन्जीद हसन तमीमने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३१ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह ५२ धावा केल्या. सैफ हसनने ३० आणि तौहीद हृदयॉयने २६ धावांचे योगदान दिले. कर्णधार लिटन दास (९) आणि शमीम हुसेन (११) स्वस्तात परतले. झाकीर अली आणि नुरुल हसन प्रत्येकी १२ धावा काढून नाबाद राहिले. अफगाणिस्तानकडून कर्णधार रशीद खान आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी दोन तर अजमतुल्लाह उमरझाई यांनी एक विकेट घेतली.
ग्रुप बी मध्ये असलेला अफगाणिस्तान संघ दुसऱ्यांदा स्पर्धेत खेळत आहे. जर रशीद ब्रिगेडने आज विजय मिळवला तर त्यांना सुपर-४ चे तिकीट मिळेल. अफगाणिस्तानने त्यांच्या पहिल्या सामन्यात हाँगकाँगचा ९४ धावांनी पराभव केला होता. दरम्यान, बांगलादेश संघ ग्रुप स्टेजमधील तिसरा आणि शेवटचा सामना खेळत आहे. जर बांगलादेश आज हरला तर ते स्पर्धेतून बाहेर पडेल. सध्या त्यांचे दोन सामन्यांतून दोन गुण आहेत. बांगलादेशला शेवटच्या सामन्यात श्रीलंकेकडून ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता.