BCCI announces Central Contract! 34 players become rich, big information about Ishan Kishan revealed..
BCCI Central Contract 2025 : भारतात सध्या आयपीएल 2025 चा थरार सुरू आहे. आतापर्यंत ३८ सामने खेळवण्यात आले आहेत. सर्व भारतीय खेळाडू आपापल्या संघाकडून आयपीएल खेळण्यात व्यस्त आहेत. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सोमवार २१ एप्रिल रोजी केंद्रीय कराराची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने एकूण ३४ खेळाडूंना करारात सामावून घेतले आहे. बोर्डाने १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत केंद्रीय करार यादी जाहीर केली आहे. फलंदाज श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक इशान किशन यांचा देखील केंद्रीय कराराच्या यादीत परतले आहेत. मागील वर्षी, बीसीसीआयने या दोघांनाही वार्षिक करारातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. विशेष म्हणजे यावेळी बीसीसीआयने ए प्लस श्रेणीमध्ये चार खेळाडूंचा समावेश केला आहे.
हेही वाचा : PBKS vs RCB : पराभव लागे जिवा! सामन्यानंतर श्रेयस अय्यरने नियंत्रण गमावले, विराट कोहलीशी वादावादी..
बीसीसीआयकडून ए प्लस श्रेणीत ४, ए श्रेणीत ६ , बी श्रेणीत ५, आणि सी श्रेणीत १९ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ए प्लस श्रेणीमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या दिग्गज खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मागील वर्षी रोहित, विराट आणि जडेजा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तरी देखील बोर्डाने त्यांना उच्च श्रेणीतील खेळाडूंमध्ये कायम ठेवले आहे. सध्या केवळ जसप्रीत बुमराह हा एकच खेळाडू आहे जो सध्या भारताकडून तिन्ही स्वरूपाच्या खेळात खेळतो.
बीसीसीआयने केंद्रीय कराराच्या ए+ ग्रेडमध्ये ४ खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना या श्रेणीत स्थान दिले आहे.
ए ग्रेडमध्ये ६ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये मोहम्मद सिराज, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांचा या यादीत समावेश केला आहे.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
BCCI announces annual player retainership 2024-25 – Team India (Senior Men)#TeamIndia
Details 🔽https://t.co/lMjl2Ici3P pic.twitter.com/CsJHaLSeho
— BCCI (@BCCI) April 21, 2025
बी श्रेणीतील खेळाडू
नवीन केंद्रीय करारामध्ये श्रेयस अय्यर बी ग्रेडमध्ये पुनरागमन केले आहे. श्रेयस व्यतिरिक्त, या श्रेणीमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
सी ग्रेडमध्ये एकूण १९ खेळाडूंना स्थान देण्यात लें आहे. यामध्ये इशान किशन, रिंकू सिंग, टिळक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर,संजू सॅमसन, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, रजत पाटीघर, प्रसीद कृष्णा, ध्रुव जुरेल, नितीश कुमार शर्मा, चबकर रेड्डी, अभिषेक कुमार रेड्डी, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अभिषेक कुमार रेड्डी अशी नावे आहेत.