रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
MI vs CSK : आयपीएलचा ३८ वा सामना काल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात खेळवण्यता याला. या सामन्यात मुंबईने चेन्नईचा दारुण पराभव केला. या विजयाने मुंबईने मागच्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १७६ धावा करण्यात आल्या. प्रतिउत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने चेन्नईला पराभवाची धूळ चारली. या विजयसह मुंबईने लागोपाठ तिसरा विजय नोंदवला आहे. या सामान्यात हिटमॅनरोहित शर्माने ४५ चेंडूत नाबाद ७६ धावांची खेळी केली. या खेळीसह तो लयीत आल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून अलीकडेच जाहीर करण्यात आले की, त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वानखेडे स्टेडियमवरील एका स्टँडला रोहितचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. रोहित व्यतिरिक्त, स्टँडला भारताचे महान फलंदाज अजित वाडेकर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे देखील नाव दिले जाणार आहे. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणतो की, याला तो एक मोठा सन्मान मानतो. यानंतर तो बोलताना भावुक झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा : PBKS vs RCB : पराभव लागे जिवा! सामन्यानंतर श्रेयस अय्यरने नियंत्रण गमावले, विराट कोहलीशी वादावादी..
चेन्नईविरुध्दच्या सामन्यानंतर, रोहित शर्माने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. तो म्हणाला की, ‘एके काळी मला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात ये नव्हता. स्टेडियमच्या बाहेर उभे राहून आत डोकावण्याची देखील परवानगी देण्यात येत नव्हती. आज, जेव्हा मी त्याच मैदानावर खेळत आहे आणि तिथे माझ्या नावाचे एक स्टँड आहे. तेव्हा मला काय प्रतिक्रिया द्यावी हे नक्की समजत नाहीये. हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे.’ असे रोहित म्हणाला.
रोहित पुढे म्हणाला की, मी माझे बहुतेक क्रिकेट याच स्टेडियमवर खेळलो आहे. माझ्या लहानपणी मला हे मैदान केवळ दुरूनच दिसत असे आणि आज जेव्हा तिथे खेळताना मी शॉट मारला आणि चेंडू थेट ‘रोहित शर्मा स्टँड’ वर जाऊन पोहोचला, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. त्यावेळी मी माझ्या भावनांवर नियंत्रण ताबा ठेवू शकलो नाही.
हेही वाचा : MI vs CSK : IPL मध्ये Rohit Sharma कडून विराट कोहलीचा विक्रम खालसा, असा करणारा ठरला एकमेव भारतीय खेळाडू..
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या विजयाबद्दल म्हणाला की, संघाचा फॉर्म योग्य वेळी शिखरावर असून आणि लागोपाठ तीन सामने जिंकल्यानंतर संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्रीजवर थांबणे आणि सामन्याचा शेवट करणे. हेच सर्वात जास्त आनंद देणारे आहे.