PBKS vs RCB : आयपीएल २०२५ चा १८ हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ३८ सामने खेळवून झाले आहेत. काल रविवारी (दि. २० एप्रिल) रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एक रोमांचक सामना बघायला मिळाला. या सामन्यात आरसीबीने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करत पंजाबने १५७ धावा केल्या. प्रतिउत्तरात आरसीबीकडून विराट कोहलीने जबरदस्त खेळी करून पंजाबला विजयापर्यंत नेळे. त्यान ५४ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या. तसेच देवदत्त पडीकलने देखील शानदार अर्धशतक करून आरसीबीच्या विजयात महत्वाचा वाट उचलला. त्याने ३५ चेंडूत ६१ धावा केल्या. दरम्यान सामाना संपल्यानंतर कोहली आणि पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यात थोडीशी अनोखी अशी बाचाबाची झाल्याचे दिसून आले.
मागील शुक्रवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि पंजाब किंग्ज आमनेसामने भिडले होते. त्यावेळी पंजाबने आरसीबीला धूळ चारली होती. त्यानंतर बेंगळुरूने पंजाबच्या घरच्या मैदानावर प्रवेश केला आणि त्यांचा दारुण पराभव केला. बेंगळुरूने आपला बदला पूर्ण केल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. अशातच, सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने मैदानावर एक विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केले, ज्यामुळे पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर मात्र नाराज दिसून आला.
हेही वाचा : PCB : अरे काय ही पीसीबीची गरीबी..! पाकिस्तानचा माजी मुख्य प्रशिक्षक गिलेस्पी अजूनही पाहतोय मानधनाची वाट..
विराट कोहली मैदानावर बराच सक्रिय दिसून येत असतो. विकेट पडल्यानंतर किंवा मोठे शॉट्स खेळल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया लगेच दिसून येतात. त्याचप्रमाणे, आज पंजाबविरुद्ध जिंकल्यानंतर, त्याने अय्यरला चिडवल्यासारखे एक अद्भुत असे सेलिब्रेशन केल्याचे दिसून आले. पण नंतर दोघांमध्ये एक छोटेखानी वाद झाल्याचे देखील दिसून आले.
विराट आणि कोहली या दोघांचा एक व्हिडिओ सद्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबद्दल चाहते दोन गोष्टींबद्दल बोलत आहेत. काही लोकांचा असा दावा आहे की, अय्यर कोहलीच्या सेलिब्रेशनवर रागावला होता, म्हणूनच दोघांमध्ये वाद झाला. पण, काही लोक म्हणतात की दोघांमध्ये मजा आणि मस्ती दिसून येत आहे. वास्तविक पहता नेमकं काय घडलं? तर ते केवळ त्या दोघांनाच माहित असावे.
हेही वाचा : MI vs CSK : IPL मध्ये Rohit Sharma कडून विराट कोहलीचा विक्रम खालसा, असा करणारा ठरला एकमेव भारतीय खेळाडू..
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने काल मल्लनपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्जला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने ७३ धावांची खेळी केली. हा सामना आरसीबीने ७ विकेट्सने जिंकला.